Wednesday, October 20, 2021

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)
हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची वेळ आली. कष्ट करुनही प्राक्तनात घामाचे दाम नसल्याने व्यथा सांगावीच कुणाला आणि निवारणार कोण या संभ्रमात शेतकरी आहेत
मागील वर्षी याच वेळी भाजीपाल्याला चांगले बाजार भाव मिळाले. यावर्षीही भाजीपाला सुबत्ता मिळवून देईल अशा अपेक्षेने शेतकर्‍यांनी भाजीपाल्याची मोठी लागवड केली. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी या पिकांबरोबरच भाजीपाल्याची इतरही अनेक नगदी पिके शेतात उभी आहेत.परंतु गेल्या काही दिवसापासून भाजीपाल्याचे बाजार भाव मातीमोल झाल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक आरिष्ट तर आलेच शिवाय कर्जबाजारी होण्याचीही वेळ आली

टोमॅटो पिकाचा उत्पादन खर्च एकरी एक ते दीड लाखापर्यंत झाला. कोबी,फ्लॉवर आणि वांग्याचाही साठ हजारापर्यंत खर्च केला. परंतु मिळणार्‍या बाजारभावात उत्पन्न तर सोडा झालेला खर्चही पदरी पडणार नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी आपल्या भाजीपाल्याच्या उभ्या फडात मेंढरे सोडून दिली. भाजीपाल्याची लागवड दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी मोठ्या प्रमाणावर झाली. मर्यादित पाऊस झाल्याने भाजीपाल्याची पिकेही नुकसान न झाल्याने चांगली आली. भाजीपाला उत्पन्नात मोठी वाढ झाली. बाजारपेठेत आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने भाजीपाल्याचे भाव पडले. मागणी कमी आणि पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्याने सर्वत्रच भाजीपाल्याची अवस्था बिकट आहे

टोमॅटो 2 रुपये, कोबी 2 रुपये,फ्लॉवर 5 रुपये, भेंडी 8 रुपये, वांगी 8 रुपये, ढोबळी 4 रुपये प्रतिकिलो अशी सध्याची पुणे बाजारपेठेतून बाजारभावाची माहिती मिळाली. इतरही सर्वच भाजीपाला याच दरम्यान किंवा यापेक्षाही कवडीमोल किमतीचा झाला आहे. शेतात उभारलेल्या भाजीपाल्याची तोडणी करणेही शेतकर्‍यांना परवडत नसल्याने अखेर हातातोंडाशी आलेला घास सोडून देण्याची वेदना अनेकांच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवते. करोना कालावधीत देशाच्या एकूण अर्थसंकल्पात इतर क्षेत्रांच्या तुलनेत शेतीक्षेत्राची कामगिरी सरसच राहिली. परंतु देशाला जगविणारा आणिआर्थिक हातभार लावणारा जगाचा पोशिंदा आज गलितगात्र झाल्याचे चित्र आहे.

शेतीच्या प्रश्‍नावर सर्वचजण पोटतिडकीने बोलतात. प्रसार माध्यमांमुळे या विषयावर बोलता-बोलता किंवा आंदोलन करुन अनेक जण राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर मोठे नेते झाले. परंतु यामुळे शेतकर्‍यांच्या व्यथेत तसूभरही फरक पडला नाही. शेतकर्‍यांना हमीभाव देऊ अशी वल्गना सारेच करतात परंतु शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर केवळ राजकारण केले जाते हा आजपर्यंतचा अनुभव आहे. शेतीवरील टोळधाड,अतिवृष्टी, अनावृष्टी हे अस्मानी संकट असते. अशी संकटे निवारण करता येत नाहीत परंतु मानवनिर्मित संकटे जेव्हा शेतीवर येतात तेव्हा त्यांचे निवारण कोण करणार? हा खरा प्रश्‍न आहे.शेतकर्‍यांना कायमस्वरूपी हमी बाजारभाव दिल्याशिवाय शेतकर्‍यांवरील आर्थिक आरिष्ट दूर होणार नाही.देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या शेतीला सर्वच राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.देश स्वतंत्र झाला तरी कृषिप्रधान देशात 75 वर्षातनंतरही शेतकरी मात्र अरिष्टांच्या पारतंत्र्यातच आहे.
भाऊसाहेब चासकर
शेतकरी,सामाजिक कार्यकर्ते (अकोले)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...