Wednesday, October 20, 2021

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले


संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे. हि घटना आज मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, चिठ्ठीमध्ये कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

संगमनेर बस स्थानकात पाथर्डी-नशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) ही बस उभी होती. त्यामध्ये तेलोरे यांचा गळफास लावून घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. बसचे वाहक पोपट साहेबा जावळे (पाथर्डी डेपो) यांनी पोलिसांना माहिती कळविली. पहाटे पाचच्या सुमारास तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. डेपोतून बाहेर पडताना ते पुढे निघाले.

मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या, असे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. थोड्यावेळाने वाहक जावळे बसमध्ये आले. त्यावेळी चालक तेलोरे यांचा मृतदेह बसमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रवाशांना उभे राहताना पकडण्यासाठी बसच्या छताला जो बार लावलेला असतो, त्याला सुती दोरीच्या सहायाने तेलोरे यांनी गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिस तब्बल दोन तासांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नमोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही.

पोलिसांनी ही माहिती तेलोरे यांच्या कुटुंबियांना कळविली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. कुटुंबाकडे चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.



प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...