Monday, July 19, 2021

डॉ. सचदेव यांच्या सी.टी.स्कॅन सेंटरचा रविवारी शुभारंभ

संगमनेर (प्रतिनिधी)
मागील वीस वर्षांपासून संगमनेर व आजूबाजूच्या अनेक तालुक्यांतील नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे येथील डॉ. सचदेव व परिवाराच्या वतीने रुग्णासांठी सी.टी.स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉप्लर व एक्स-रे सेंटरचा भव्य शुभारंभ रविवार दि. 18 जुलै रोजी होत आहे अशी माहिती डॉ. प्रदिप सचदेव, डॉ. योगेंद्र सचदेव, डॉ. शालीनी सचदेव, डॉ. मनोहर सचदेच, डॉ. वैष्णवी सचदेव, डॉ. शोभा सचदेव यांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सचदेव सोनोगाफ्री सेंटरच्या माध्यमातून सचदेव परिवार रुग्णसेवा करत आहे. या परिवारातील अनेक सदस्य वैद्यकीय सेवेत कार्यरत असून समर्पक भावनेने रुग्णसेवा देत आहे. काळाजी गरज ओळखून व रुग्णांची अडचण ओळखून डॉ. सचदेव यांच्यावतीने शहरातील जाणता राजा मार्ग येथे भव्य सी.टी.स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉप्लर व एक्स-रे आदी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर या सेंटरमध्ये पोटाची सोनोग्राफी, गरोदर मातेची सोनोग्राफी, स्त्री-बीज तपासणी, छातीची सोनोग्राफी, थायरॉईड स्कॅन, स्क्रोटम सोनोग्राफी, डोळ्याची सोनोग्राफी, एन.टी.व अ‍ॅनोमली स्कॅन, कलर डॉप्लर, फिटल व पेडियाट्रिक इकोकार्डिओग्राफी बायोप्सी तसेच अत्याधुनिक एक्स-रे या सुविधा उपलब्ध आहेत.

संगमनेरात अशा सुविधा उपलब्ध झाल्याने आता यापुढे गरजू रुग्णांना मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या शहरात जावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैशांची बचत होणार आहे.रविवार दि. 18 जुलै रोजी कोरोना नियमांचे पालन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार होणार आहे. संगमनेरकरांनी या आरोग्य सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा व या नवीन सेंटरला शुभेच्छा द्याव्या असे आवाहन सचदेव परिवाराने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस – महसूल मंत्री नामदार थोरात ; अमृतवाहिनी बँकेच्या वतीने क-हे घाटात वृक्षारोपण

संगमनेर (प्रतिनिधी)ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव उपाय आहे. मागील दोन वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात प्राणवायूचे...

सरपंच असलेल्या पत्नीच्या कारभारात आता पतीराजांची ढवळाढवळ चालणार नाही ; विभागीय आयुक्तांना कारवाई करण्याचे अधिकार

संगमनेर (प्रतिनिधी)ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच्,सदस्य यांच्या नातेवाईकांकडून कामात हस्तक्षेप झाल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्याविरुद्ध मुंबई...

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी निलंबित; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्यावर कामात कुचराई, कर्तव्यात कसूर, स्टेशन डायरीत चुकीच्या...

T20 Worldcup : टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा ; भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात

आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२०...