युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा माणून मागील सहा वर्षांपासून समर्पित भावनेने आरोग्य सेवा देणारे शहरातील नवीन नगररोड (लिंक रोड) येथील वाणी हॉस्पिटलचा सातवा वर्धापनदिन मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या वर्धापनदिनानिमित्त वाणी हॉस्पिटल व इनरव्हिल क्लब ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व वयोगटातील महिलांसाठी स्तनांच्या गाठीचे मशीनद्वारे मोफत निदान तसेच रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. प्रतिक वाणी व डॉ. श्रध्दा वाणी यांनी दिली.
वाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य रूग्णांवर नेहमीच आपुलकीने आरोग्य सेवा दिली जाते.
अनेक गंभीर आजारावर योग्य उपचार करून रूग्ण ठणठणीत बरे करण्यात या हॉस्पिटलचा हातखंडा आहे. स्त्रीयांच्या वेगवेगळ्या आजाराचे वेळीच निदान करून योग्य उपचाराद्वारे त्यांना दिलासा देऊन वेदनामुक्त करण्यावर तसेच संतती सुख देण्यासाठी खात्रीशीर उपचारासाठी हे दोन्ही तज्ञ ओळखले जातात. दरम्यान हॉस्पिटलच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून नेहमीच रूगणांसाठी पोटदुखीचे आजार, मुळव्याध, शरीरावरील गाठी, गर्भिणी तपासणी, गर्भपिशवीचे आजार, वंध्यत्व इत्यादी आजारावर मोफत व माफक दरात तपासणी व उपचार करण्यात येत असतात. यावर्षीही वर्धापनदिन दिनानिमित्त आयोजित शिबीरात महिलांच्या स्तनातील गाठीचे मशीनद्वारे निदान व उपचार करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर घेऊन अनेकांना नव जीवन देण्यासाठी या हॉस्पिटलने पुढाकार घेतला आहे.
तरी या शिबीरात सहभागी होण्यासाठी 7776022777 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. वाणी यांनी केले आहे.