Saturday, July 10, 2021

प्रा. डॉ. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना डॉक्टरेट प्रदान

संगमनेर (प्रतिनिधी) – अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर मधील वर्कशॉप विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रविंद्र सोमनाथ ताजणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाचस्पती पदवीने गौरवण्यात आले आहे. “इन्वेस्टीगेशन अँड मल्टी ऑब्जेक्टिव ऑप्टिमाइजेशन ऑफ बर्निशिंग प्रोसेस” या विषयावर प्राध्यापक ताजणे यांनी प्रबंध सादर केला. सदर प्रबंधासाठी सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ, अभ्यासमंडळाचे सदस्य आणि के के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रोडक्शन विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. जे. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या प्रबंधाचे मूल्यमापन डॉ. ए. आर. ठाकूर व डॉ. एन. आर. गिलके यांनी केले.  प्रबंध सादरीकरणवेळी सदर विषयातील तज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.

प्राध्यापक रवींद्र ताजणे हे गेल्या तीस वर्षांपासून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अभिनव उपक्रम राबविले. अभ्यासक्रम  मंडळात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कमवा व शिका योजना, रक्तदान, राष्ट्रीय सेवा योजना, टेक्निकल सेमिनार, वर्कशॉप यासारख्या उपक्रमांमधून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. या कार्यकाळात त्यांनी संस्था पातळीवर तसेच विद्यापीठ पातळीवर अनेक पदे भूषविली आहेत. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे ते चेअरमन आहेत.


या गौरवाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीरजी तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, कारखान्याचे संचालक श्री. इंद्रजित थोरात, संचालिका सौ शरयूताई देशमुख, व्यवस्थापक प्राध्यापक व्ही बी धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. ए. व्यंकटेश, उपप्राचार्य प्राध्यापक ए. के. मिश्रा, रजिष्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...