संगमनेर उपविभागात 67 हजार दाखल्यांचे वितरण

डॉ. शशिकांत मंगरूळे

महाराजस्व अभियानात संगमनेर व अकोले तहसीलची उल्लेखनीय कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत संगमनेर व अकोले तालुक्यात राबविण्यात आलेल्या ‘महाराजस्व अभियानात’ आतापर्यंत 67183 दाखले वितरित करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे.


शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 2022 मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये करिता आवश्यक असणारे कागदपत्रे काढताना येणार्‍या अडचणी दूर होऊन, किमान कागदपत्रात व शासकीय शूल्क दरात प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देणेच्या हेतूने संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने डिसेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांच्या सहकार्यातून शाळा, महाविद्यालयातच शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात जात प्रमाणपत्र- 13687, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र – 4743, उत्पन्नाचे प्रमाणपत्र- 35360, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र- 10418, डोंगरी दाखले- 1771, 33 टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र- 149 व आर्थिक मागास प्रमाणपत्र – 987 व केंद्रीय आर्थिक मागास प्रमाणपत्र 68 असे एकूण 67186 दाखले वितरित करण्यात आले.


शासनाने सेवा हमी कायद्याने निर्धारित केलेल्या वेळेपूर्वी या अभियानात दाखले उपलब्ध करून देण्यात आली. अभियान यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तहसीलदार अमोल निकम, अकोले तहसीलदार सतीष थेटे यांच्यासोबतच तहसील कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर मोहिमेकरीता संगमनेर व अकोले तालुक्यातील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, सेतू केंद्रचालक, सीएससी चालक व आपले सरकार सेवा केंद्रचालक यांचे सहकार्य लाभले लाभले. शाळा महाविदयालयांच्या प्रवेश कालावधीत हे अभियान राबविल्याने विद्यार्थ्यांना दरवर्षी होणारा त्रास कमी झाला आहे. यापुढेही महसूल विभागाकडून विद्यार्थी व सर्व सामान्य नागरीकांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावीणी केली जाईल असे श्री. मंगरूळे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख