Monday, May 3, 2021

कोरोना प्रादुर्भावामुळे देवगड यात्रा रद्द !

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेरसह नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील श्री क्षेत्र खंडोबा (देवगड) यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे.


माघ पौर्णिमेला दरवर्षी देवगड खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत हा यात्रा उत्सव होणार होता. दरम्यान या यात्रेसाठी संगमनेरसह शेजारच्या जिल्ह्यातील लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तीन दिवस हा यात्रा उत्सव चालतो. यावर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून शासनाच्या आदेशानुसार सर्व यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. देवगड खंडोबाची यात्रा सुध्दा रद्द करण्यात आली आहे.

तसेच आगामी तीन दिवस मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याने भाविकांनी नवस फेडण्यासाठी, दर्शनासाठी येऊ नये तसेच हलवाई व इतर दुकानदारांनी आपली दुकाने लावू नये. या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्यास प्रशासनाच्या वतीने कलम 144 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तरी भावीकांनी याची नोंद घ्यावी व देवस्थानला सहकार्य करावे असे अवाहन संगाजी पावसे, उपाध्यक्ष अण्णासाहेब येरमल, मोठ्याभाऊ बडे, बाबासाहेब पावसे यांच्यासह देवस्थान ट्रस्टने केले आहे.

यात्रा रद्द मात्र अनेकांच्या रोजीरोटीवर गदा !!

कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने सगळीकडचेच यात्रोत्सव रद्द होत आहे. मागील एक वर्षांपासून जत्रा यात्रा बंद आहेत. याचा परिणाम यात्रेच्या माध्यमातून आपली रोजीरोटी भागविणाऱ्या हलवाई, खेळणी वाले, झोपाळा वाले, तमाशा यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या गावोगावी फिरून आपले पोट भरणाऱ्या व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर गदा कोसळली आहे. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने याची दाखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,909चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर ओबीसी मोर्चा सरचिटणीस पदी भारत गवळी यांची निवड

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गाङेकर यांनी संगमनेरात मागील अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे...

संगमनेर मधील प्राथमिक शिक्षकांनी उभारलेल्या ‘कोविड केअर’ सेंटर चे काम राज्यातील शिक्षकांसाठी दिशा दर्शक

संगमनेर (प्रतिनिधी) - राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य...

अज्ञात इसमांकडुन बदाम वृक्षाची तोड; वृक्षप्रेमींमध्ये संताप

संगमनेर (प्रतिनिधी)स्वच्छ संगमनेर, हरित संगमनेर या अंतर्गत संगमनेर नगरपालिकेने पूणे नाशिक महामार्गालगत अनेक वृक्ष लावलेले आहेत. निमोण...

दुधाला किमान पाच रुपये अनुदान द्या -सतिशराव कानवडे

संगमनेर:-कोरोना महामारीच्या संकटामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. टाळेबंधीच्या नावाखाली राज्य सरकारने दुधाचे भाव...

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...