Saturday, May 1, 2021

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)
तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज उठविल्याने काही गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्याला धमकी देतात. याचीही दखल पोलीस घेत नसल्याने थेट आपले सरकार पोर्टलवर पोलीसांविरुध्द गंंभीर आरोप करत पोलीसांची बदनामी करणारा मजकूर टाकला. या प्रकरणी तालुका पोलीसांनी प्रशांत विलास कचेरे (रा. धांदरफळ खुर्द) याच्याविरुध्द विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.

याबाबत तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेंद्र रामनाथ सहाणे यांनी फिर्याद दाखल केली. यात त्यांनी म्हटले आहे की, मी महेंद्र सहाणे धांदरफळ बीटचा तपासी अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत आहे. सोबत सहाय्यक फौजदार बी. बी. घोडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एम.एन. जाधव हे बीट अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान आरोपी प्रशांत विलास कचेरे याने 21 एप्रील रोजी आपले सरकार पोर्टलवर पोलीसांवर भ्रष्टाचार व दारुचे हफ्ते घेत असल्याबद्दल खोटी व बदनामीकारक तक्रार टाकली. धांदरफळ खुर्द परिसरात चालणार्‍या अवैध दारुविक्रीची माहिती आपण पोलीसांना देतो त्यामुळे अवैध व्यवसाय करणारे गुंड मला धमकी देतात. पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यावर माझा विश्‍वास राहिला नाही. ते आर्थिक देवाण घेवाणीमुळे या अवैध धंद्याला पाठीशी घालतात. असे बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप आपले सरकार पोर्टलवर व सोशल मिडीयावर टाकून पोलीसांची जनमानसातील प्रतिमा मलिन केली.

दरम्यान आरोपी प्रशांत कचेरे व त्याचे कुटूंबिय हे पुर्वीपासुन दारुविक्री व्यावसायीक असून सद्यस्थितीत त्यांच्यावर पुर्णपणे निर्बंध आहेत. बेकायदा दारुविक्री प्रकरणी त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तसेच कचेरे यांनी त्यांना मिळत असलेल्या धमक्यांबाबत तालुका पोलीस स्टेशनला कधीही लेखी किंवा तोंडी तक्रार दिलेली नाही. असे असतांना पोलीसांची प्रतिमा मलीन करणारी व त्यांच्यावर भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप करणारी पोस्ट आपले सरकार पोर्टलवर टाकून पोलीसांची बदनामी केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीवर गुन्हा रजि नं. 167/2021 पोलीस अप्रितीची भावना चेतवणे अधिनियम 1922 चे कलम 3 प्रमाणे दाखल करुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहेत.


दरम्यान पोलिस निरीक्षक पाडूरंग पवार यांनी आरोपीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून कुठल्याही प्रकरे अवैध धंद्यांना पाठिशी घातले जात नाही. कचेरे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी पोलिसांची बदनामी केली आहे.
दरम्यान आरोपी प्रशांत कचेरे यांनी आपले सरकार पोर्टलवर हफ्तेखोरीचा व दारु विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचा गंभीर आरोप पोलीसांवर केला आहे. अवैध दारुविक्री संदर्भात पोलीस निरीक्षकांना पुराव्यासह गुप्त माहिती दिली असता. दुसर्‍याच दिवशी कोणतीही कारवाई न होता ज्यांच्याविषयी माहिती दिली त्यांचे गुंड आपल्याला धमक्या देतात. पो. निरीक्षक ही गुप्त माहिती आरोपींना देतात त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी आपले सरकार पोर्टलवर कचेरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,909चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...