Saturday, May 1, 2021

संकटकाळात नगरसेवक बेपत्ता ! सोशल मिडीयावर नगरसेवक सापडून द्या अभियान !!

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. रोज दोनशे ते अडीचशे रुग्ण सापडत असल्याने या रुग्णांना हॉस्पिटल, बेड, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, इंजेक्शन, औषधे मिळत नसल्याची अवस्था निर्माण झाली आहे. शासकीय प्रशासन नागरिकांना सोयी सुविधा देण्यात कमी पडत आहेत. अशा या कठीण प्रसंगात शहरातील अपवाद वगळात अनेक नगरसेवक बेपत्ता झाल्याचे दिसत आहे. इतर वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी नेतेगिरी करणारे व पालिका निवडणूकीत लाखो रुपयांची उधळण करणारे हे नगरसेवक आज कोणत्या बिळात लपले आहेत अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहे. सोशल मिडीयावर तर ‘तुमचा नगरसेवक तुमच्या संपर्कात आहे का? असला तर सापडून द्या’ असे अभियानच एकप्रकारे सुरु आहे. सोशल मिडीयावर अनेक जण व्यक्त होत असुन निष्क्रीय नगरसेवकांबद्दल संताप व्यक्त करत आहेत.


कोरोना महामारीने व त्यातच लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाले आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांचे तर प्रचंड हाल होत आहे. सरकार व राजकीय नेत्यांकडून आश्‍वासनापलिकडे त्यांना काहीही मिळत नाही. मात्र त्यांचा संपर्क असलेल्या प्रभागातील नगरसेवकांकडून त्यांना मोठ्या अपेक्षा असतात. संकट काळात हॉस्पिटल मिळून द्यावे,बेड मिळवून द्याव किंवा गरज पडल्यास इंजेक्शनची सोय करण्यास मदत करावी. अशी माफक अपेक्षा त्यांच्याकडून असते. मात्र हेच नगरसेवक सध्या नॉट रिचेेबल असून अनेकांनी तर आपल्या प्रभागाकडे पाठ फिरविली आहे. अनेकजण तर फोनही उचलत नाही अशी परिस्थिती आहे. निवडणूकीत मत मागण्यासाठी पन्नास वेळा घरी येणारे व मतासाठी पैशांचे आमिष दाखविणार्‍या त्या नगरसेवकांचे आज दर्शन दुर्लभ झाले आहे. नगरपालिकेची आगामी निवडणूक डिसेंबर मध्ये होत आहे. त्यामुळे या आजी व भावी नगरसेवकांना पुन्हा एकदा जनतेकडे मताचा जोगवा मागायला जावेच लागणार आहे. आजच्या या बिकट परिस्थितीत या नगरसेवकांनी किमान आपल्या वार्डात अत्यंत गरजू नागरिकांची मदत करावी. पैशाची नाही करता आली तरी त्यांना लागणार्‍या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी तरी प्रयत्न करावा. मात्र जे विद्यमान नगरसेवक व भावी नगरसेवक या संकट काळात नागरिकांची मदत करणार नसेल तर अशा या नगरसेवकांना जनतेनेही थारा देऊ नये अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...