Saturday, September 18, 2021

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उच्चांक; जिल्ह्यात 789 रुग्ण तर संगमनेर तालुक्यात 66 नवे रुग्ण

संगमनेर (प्रतिनिधी)
मागील दिड वर्षापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. दुसरी लाट ओसरली म्हणताना आता पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने उच्चांक गाठत तब्बल 789 संख्या गाठली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पारनेर तालुका आघाडीवर असून आजही पारनेर तालुक्याने आघाडी कायम ठेवली आहे. तर संगमनेर तालुक्यातील वाढही कायम असून आज 66 जण बाधीत आढळून आले आहे.

कोरोनाची दुसरी लाट काहिशी ओसरल्यानंतर शासनाने काही निर्बंध शिथिल केले. परिणामी नागरीकांनी नियमांचे पालन करणे सोडून देत सर्वत्र गर्दी करायला सुरुवात केली. त्यातही लग्न समारंभात व अंत्यविधीला मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

दरम्यान प्रशासनाने तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन अनेक निर्बंध लागू केले. लॉकडाऊन मधून दिलासा दिला असला तरी सायंकाळी चार वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांना बंदी घालण्यात आली. मात्र प्रशासनाची हि बंदी झुगारून नागरिक आपला व्यवसाय करत आहेत. नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना वरचढ ठरत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयातून 246, आरटिपीसीआर मधून 200, रॅपिड अँटिजन मधून 343 असे 789 इतके विक्रमी रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यातील पारनेरमध्ये सातत्याने वाढणार्‍या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. अनेक उपाययोजना राबवूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने व शासनाकडून तिसर्‍या लाटेचा धोका सांगितला जात असल्याने कोरोना रोखण्याचे मोठे आवाहन जिल्हा प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातही सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातही ग्रामीण भागात वाढलेला कोरोना अद्यापही आटोक्यात आलेला नाही. तालुक्यातील पठारभाग, साकुर परीसर, आश्‍वी परीसर याठिकाणी अद्यापही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी ग्रामीण भागातील संक्रमण प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. लग्नसमारंभात 50 वर्‍हाडींची परवानगी असताना शेकडो लोक नियम डावलून गर्दी करत आहेत. तसेच रस्त्यावर विनामस्क मोकाट फिरणार्‍यांमुळे धोका वाढला आहे.

आजची रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे ः
संगमनेर – 66, अकोले – 36, राहुरी – 12, श्रीरामपूर – 14, नगर शहर मनपा -31, पारनेर -158, पाथर्डी – 88, नगर ग्रामीण – 32, नेवासा -29, कर्जत – 81, राहाता – 18, श्रीगोंदा – 87, कोपरगाव – 22, शेवगाव – 48, जामखेड – 55, भिंगार छावणी मंडळ – 3, इतर जिल्हा – 3, मिलिटरी हॉस्पिटल -1

एक प्रतिक्रिया

  1. संगमनेर तालुक्याची विस्तृत माहिती द्यावी. शहरात किती व ग्रामीण भागात कोठे किती रुग्ण ही माहिती रोजचे रोज द्यायला हवी ही विनंती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...

हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)हुल्लडबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे...

संगमनेरात 25 बसचे निर्जंतुकीकरण; अ‍ॅन्टी-मायक्रोबायल ट्रिटमेंटमुळे प्रवाशांचा होणार कोरोनापासून बचाव

संगमनेर (संजय आहिरे)कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर...