Saturday, July 10, 2021

कोरोनाचा उद्रेक : IPL आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह !!

नवी दिल्ली: IPL 2021जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच मिनी लिलाव झाला होता. एपिल महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आठ संघ जोरदार प्रयत्न करत असताना एका गोष्टीमुळे बीसीसीआयचे टेन्शन वाढले आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन नियोजित वेळेत झाले नव्हते त्याच बरोबर ही स्पर्धा भारता ऐवजी युएईमध्ये प्रेक्षकांशिवाय आयोजित करावी लागली होती. आता देशात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढल्यामुळे आगामी हंगामातील सामने मुंबईत न होण्याची शक्यता आहे.


बीसीसीआय या वर्षी आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा विचार करत आहे. पण महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे बोर्डाला आता दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.
मुंबईसह राज्यातील काही शहरात करोना व्हायरसचे रुग्ण सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या आयोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एका वृत्तानुसार बीसीसीआय आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी ४-५ पाच स्थळांचा विचार करत आहे.


याआधी मुंबईच्या वानखेडे, ब्रेबोर्न, डीवायपाटील, रिलायन्स स्टेडियम या ठिकाणी बायो बबल तयार करून स्पर्धा घेण्याचा विचार होता. पण आता करोनामुळे ही गोष्ट अशक्य वाटत आहे.
मुंबईत करोना रुग्ण वाढल्यामुळे आता बीसीसीआय दुसऱ्या पर्यायाचा विचार करत आहे. स्पर्धा सुरू होण्यास फार कालावधी शिल्लक नाही. बीसीसीआयकडून हैदराबाद, बेंगळुरू आणि कोलकाता सारख्या शहरात सामने घेतले जाऊ शकतात. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफ आणि फायनलची मॅच होऊ शकते.
करोनामुळे गेल्यावर्षी आयपीएलचा १३वा हंगाम ६ महिने उशिरा सुरू झाला होता. तेव्हा दुबई, शारजाह आणि अबुधाबी या ३ ठिकाणी सामने झाले होते. १९ सप्टेंबर रोजी सुरू झालेली स्पर्धा १० नोव्हेंबरला संपली होती. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

नामदार थोरात यांच्या उपस्थितीत गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान

संगमनेर (प्रतिनिधी) सन 2019- 20 या गळीत हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान रविवार दिनांक 11 जुलै 2021...

शहिद जवान गोकुळ कचरे यांच्या परिवारास ५१ हजार १५१ रुपयांची मदत; सैनिक कल्याण समितीची बैठक उत्साहात – विविध ठराव मंजूर

संगमनेर (प्रतिनिधी)सैनिक कल्याण समिती संगमनेर (महाराष्ट्र राज्य) समितीची मासिक मीटिंग रविवार दिनांक 4 जुलै रोजी समितीच्या कार्यालयात...

…माझ्यासाठी तो कॅच ऑफ द इयर : सचिन तेंडुलकर ; हरलीन देओलचा सुपरकॅच व्हायरल, नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव

क्रिकेटमध्ये आजवर सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये टी-२०च्या जमान्यात जिथे प्रत्येक...

सावधान : जिल्ह्यात कोरोना वाढतोय; संगमनेरातही रूग्णसंख्येत वाढ – 60 रूग्णांची भर

संगमनेर (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही दिवसांपासून किंचित वाढ होणार्‍या कोरोनामध्ये आज मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज...

रविवारी 500 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण- सौ. दुर्गाताई तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)कोरोना पार्श्‍वभूमीवर संगमनेर शहरातील पाचशे ज्येष्ठ नागरिकांना संगमनेर नगर परिषदेच्या वतीने रविवारी दिनांक 11 जुलै 2021...