आ. बाळासाहेब थोरातांचा मलाच आशिर्वाद मिळेल – पाटील

शुभांगी पाटील

शुभांगी पाटील यांचा संगमनेरातून प्रचाराचा शुभारंभ
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मी केवळ शिवसेनेची नाही तर महाविकास आघाडीची उमेदवार आहे. नात्यागोत्यापेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणी कुठे गेले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचा मलाच आशिर्वाद व पाठिंबा मिळेल असा विश्‍वास नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकासआघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आज शुभांगी पाटील यांनी संगमनेरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांनी आज येथील राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्षाने विश्‍वास दाखवून व कोरा ए.बी. फॉर्म देऊनही सत्यजित तांबे यांनी पक्षाचा अधिकृत अर्ज भरला नाही. तसेच विरोधी पक्षाकडे पाठिंब्याची मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांना नाकारत या सशक्त महिला म्हणून माझ्यावर विश्‍वास दाखवत मला पाठिंबा जाहीर केला.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी एकमुखी माझ्या विजयासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आ. बाळासाहेब थोरात यांनीही महाआघाडीचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा दिला. तसेच विविध शिक्षक संघटना, पदवीधरांनी पाठिंबा दिला आहे. तसेच आज टीडीएफ संघटनेच्या होणार्‍या बैठकीत मलाच पाठिंबा मिळेल असा विश्‍वास आहे. तीन टर्म संधी मिळूनही त्यांना अनेक प्रश्‍न सोडवता आले नाही. दरम्यान पदवीधरांच्या व शिक्षकांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवत आपण आंदोलनही केले आहे. त्यामुळे पदवीधरांना आपण नक्कीच न्याय देऊ. यापुर्वीही आपण संगमनेरात अनेकवेळा येऊन येथील प्रश्‍नावर संघर्ष केला.
जे स्वतःच्या पक्षाचे झाले नाही ते इतरांचे कसे होणार. त्यांनी पक्षाला धोका दिला मात्र आपण निष्ठेने काम करु. येथील काँग्रेसचे कार्यकर्ते जरी आज सोबत नसले तरी आ. बाळासाहेब थोरात हे लवकरच आपली भुमिका जाहीर करुन त्यांचे बळ आपल्या पाठिशी उभे करतील असा विश्‍वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शुभांगीताईंसाठी ‘सुदर्शन’चे गेट बंद
महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील आज संगमनेरात आल्या. शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांचे स्वागत केले. परंतू हेच स्वागत घेण्यासाठी त्या आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी गेल्या असत्या गेट बंद असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. गेटवरुनच त्यांनी आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मात्र शुभांगी पाटील यांच्यासाठी ‘सुदर्शन’चे गेट उघडले नाही याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख