Friday, February 3, 2023

सफायर बिजनेस एक्स्पोला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

बिजनेस एक्स्पो


२६ जानेवारीपर्यंत नागरिकांना खरेदी, मनोरंजन आणि मेजवानीची संधी

युवावार्ता (प्रतिनिधी)
नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांना नव नवीन उद्योगाची, वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशाने मागील 15 वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने भव्य सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येत असते. 20 जानेवारी पासून सुरू झालेल्या या एक्स्पोला नागरीकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत असून आता केवळ दोन दिवस बाकी असून संगमनेरकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तालुक्याच्या ठिकाणी या एक्स्पोचे काम निश्‍चितच कौतुकास्पद असून व्यवसायासोबत विकासाला चालना देणाऱ्या या एक्स्पोचा सध्या संगमनेरकर मनमुराद आनंद लुटत आहे. लायन्स सफायरचे प्रकल्प प्रमुख एम.जे.एफ गिरीष मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा, प्रकल्प प्रमुख झोन चेअरमन रोहित मणियार, अध्यक्ष उमेश कासट, सेक्रेटरी कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी व त्यांच्या टीमने मोठ्या मेहनतीने संगमनेरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.


बिझनेस एक्स्पोला संगमनेरांचा उदंड प्रतिसादही मिळत असतो. अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहे. यावर्षीही सफायर बिझनेस एक्स्पो 26 जानेवारी पर्यंत संगमनेरकरांसाठी खुले राहणार  आहे. लायन्स क्लबच्या वतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सफायरने व्यापारवृध्दी, व्यवसायाप्रती कटीबध्दता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू, सेवांची माहिती देणारा, विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील मालपाणी लॉन्स येथे हा बिझनेस एक्स्पो सुरु आहे. या एक्स्पोमध्ये नामांकित उद्योजकांनी आपले स्टॉल लावले आहेत. कोरोना काळामध्ये बिझनेस एक्स्पोसह यात्रा-जत्रा बंद असल्याने पाळणे, बे्रकडान्स, वॉटर बोट, रेल्वे या खेळण्यांना लहान मुले मुकली होती. एक्स्पोच्या निमित्ताने संगमनेरकरांना ही मोठ संधी मिळाली. मोठ्या प्रमाणावर महिला मुले या एक्सपोचा आनंद लुटत आहेत.तरी या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या टीमने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

लोकनेते आ. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी संगमनेरात शिंदेशाही बाणा कार्यक्रम

शिंदेशाही बाणा कार्यक्रमआनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांची उपस्थितीतयुवावार्ता (प्रतिनिधी)...

वाघापूरमध्ये वडाच्या झाडाची अवैध कत्तल

वडाच्या झाडाची अवैध कत्तलहजारो पक्षी बेघर, कारभारीच झाले वैरी - वनविभागाचे दुर्लक्ष

गुंजाळ कन्स्ट्रक्शनचे विक्रम गुंजाळ यांचे निधन

विक्रम गुंजाळयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - येथील सिव्हिल इंजिनियर असलेले व शहर विकासाचे अनेक शासकीय कामे उत्कृष्ट पध्दतीने करणारे...

सर्वपक्षीय पाठिंब्याने सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित

सत्यजित तांबेआता प्रतिक्षा केवळ मताधिक्याचीयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - तांत्रिक अडचणीमुळे अपक्ष उमेदवारी...

संगमनेरच्या युवकांचे हाफ आयर्नमन स्पर्धेत यश

हाफ आयर्नमन स्पर्धेत यशसंगमनेरवासियांसाठी उद्योजकांचा दिशादर्शक सहभागयुवावार्ता (प्रतिनिधी)नुकतीच कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्टस्...