Sunday, June 4, 2023

चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये घडवला इतिहास; ११८ वर्षात कुणालाच नाही जमले

ससेक्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या पुजाराने बुधवारी द्विशतक झळकावले. भारताचा स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये इतिहास घडवला.काउंटी चॅम्पियनशिपच्या या सत्रात पुजाराने झळकावलेले हे तिसरे द्विशतक ठरले असून तो एक विक्रम ठरला आहे.


ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर मिडिलसेक्स विरुद्ध ससेक्स यांच्या लढत सुरू आहे. या सामन्यात पुजाराकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुजाराने द्विशतक पूर्ण केले. पुजाराने ४०३ चेंडूत २१ चौकार आणि ३ षटकारांसह २३१ धावा केल्या. मिडिलसेक्सकडून पाच विकेट घेणाऱ्या टॉम हेल्मने पुजाराची विकेट घेतली.
पुजाराच्या द्विशतकासह एक मोठा विक्रम देखील झाला आहे. ११८ वर्षानंतर ससेक्स संघाच्या एखाद्या फलंदाजाने एका हंगामात ३ द्विशतक झळकावली आहेत. पुजाराने काउंटी चॅम्पियनशिप २०२२ मध्ये ३ द्विशतक आणि २ शतक केली आहेत. या हंगामात त्याने ६, नाबाद २०१, १०९, १२, २०३, १६, नाबाद १७०, ३, ४६ आणि २३१ अशा धावा केल्या आहेत.
या सामन्यात ससेक्सने प्रथम फलंदाजी करत ५२३ धावा केल्या. पुजाराच्या द्विशतकासोबत टॉम एल्सॉपने १३५ धावा केल्या. भारतीय खेळाडूकडून काउंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकाचा विक्रम आता पुजाराच्या नावावर झाला आहे. याआधी हा विक्रम माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता. अझरने काउंटी क्रिकेटमध्ये सलग २ शतक केली होती. आता पुजाराच्या नावावर ३ द्विशतक झाली आहेत.
पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६ द्विशतक केली आहेत. प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतक करण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी ३७ वेळा २००चा आकडा पार केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेर भव्य भगव्या मोर्चाला अद्याप परवानगी नाही; परिस्थिती पाहून लवकरच निर्णय

व्यापाऱ्यांना सक्तीने बंद करायला भाग पाडल्यास कठोर कारवाईसंगमनेर उपविभागात यापुढे गुन्ह्याला माफी नाही - डीवायएसपी वाघचौरे

इंटेलिजन्स : लाभदायक की हानीकारक

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात नकारात्मक शक्यतांविषयी तज्ञ लोकांचे भाकित(लेखक...

संगमनेरात आक्रोश, तालुका बंदसह मोर्चाचे आयोजन

मंगळवारी एकवटणार हिंदू समाज, अत्याचार रोखण्याचे आवाहनविविध संघटनाच्या सहभागातून...

जनतानगरमध्ये महिलेसह चौघांना मारहाण

मारहाणीत कोयता फायटर व गजाचा वापरमारहाणीत ६ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

संगमनेर मर्चंट्स बँक निवडणूकीत अखेरच्या क्षणी एकोप्याचे दर्शन

व्यापार्‍यांच्या कामधेनूत राजकारण टाळून बिनविरोधचा रचला इतिहासयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - बँकेचे संस्थापक स्व.ओंकारनाथजी मालपाणी...