Sunday, May 2, 2021

संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांच्यावतीने रक्तदान शिबीर उत्साहात

Blood Donation in Sangamner MIDC

संगमनेर (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपूर्ण देशात रक्ताची कमतरता भासत असून रक्तदानाचे आवाहन शासनामार्फत करण्यात येत आहे. याच पार्श्‍वभुमीवर संगमनेर औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट, बीझ इंटरनॅशनल, एल.टी.सी., विजया अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज, भंडारी अ‍ॅग्रो, ओम मंगल इंडस्ट्रिज, सुप्रभा इंडस्ट्रिज यांच्या पुढाकाराने शुक्रवार दि. 23 एप्रिल 2021 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संगमनेर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व टी.एल.सी. गु्रपचे सदस्य यांनी रक्तदान केले.


अर्पण रक्तपेढीच्या सहाय्याने औद्योगिक वसाहतीमध्ये हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 76 बॅग रक्त जमा करण्यात आले. उद्योजक नितीन हासे, कपिल चांडक, राहुल गडगे, विवेक रोहकले, सम्राट भंडारी, सौरभ आसावा, रणजित वर्पे, संगमनेर औद्योगिक वसाहतीमधील इतर उद्योजक व वसाहतीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी या रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदविला.

येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान 28 दिवसांपर्यंत म्हणजेच एक महिन्यापर्यंत रक्तदान करता येत नसल्याने अनेक रुग्णालयांतून रक्ताची मागणी वाढणार आहे. राज्यात येत्या काही दिवसांत रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी लाभार्थींनी रक्तदान करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) केले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर संगमनेरमधील उद्योजकांनी या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

सर्व उदयोजक आणि कर्मचारी यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे संगमनेर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भाऊसाहेब एरंडे यांनी या समाजकार्याबद्दल कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,908चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...