अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपाने पाठिंबा द्यावा

0
1931
सत्यजित तांबे यांना भाजपाने पाठिंबा द्यावा

प्रतिक जाजू यांची निवेदनाद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
नाशिक पदवीधर मतदार संघातून अभ्यासू व युवा नेते सत्यजित तांबे अपक्ष उमेदवारी करत आहेत. मागील अनेक वर्षांचा त्यांना सामाजिक, राजकीय कार्याचा त्यांना अनुभव आहे. युवकांसाठी रोजगार मेळावे, उद्योजक मेळावे या माध्यमातून ते तरूण, बेरोजगार व पदवीधर तरुणांसाठी काम करत आहेत. अशा अनुभवी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाने पुर्ण पाठिंबा द्यावा आणि त्यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते प्रतिक जाजू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे.


विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकांमधील नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित सुधीर तांबे यांना आपला व भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण पाठिंबा जाहीर करावा अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च विद्या विभूषित आहेत व सुसंस्कृत राजकारणाचे एक जिवंत उदाहरण म्हणून आम्ही सर्व आपल्याकडे बघतो .आपल्या विचारसरणीशी एकरूप होणारी विचारसरणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यामध्ये दिसून येते. पदवीधरांचे नेतृत्व करत असताना त्यांच्या समस्या ज्या पोटतिडकीने आपण सोडवतात तेवढ्याच हिरारीने सामाजिक भावनेने युवा नेतृत्व म्हणून सत्यजित तांबे नक्कीच सोडवतील. विचार व कृतीचा वारसा असणाऱ्या सत्यजित तांबे यांना आपल्या पाठबळाची गरज आहे. आपणांस आम्ही सर्व युवा वर्गाच्या वतीने तसेच आपल्या विचारांशी एकरूप होणारा प्रतिनिधी म्हणून आपणांस आम्ही आपणास विनंती करीत आहोत .
आपण आमच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती भूमिका आपण घ्यावी व आमच्या विनंतीचा विचार करून सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर करावा असे या निवेदनाद्वारे प्रतिक जाजू यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे.

सत्यजीत तांबे यांचे कार्य देवेंद्र फडणवीस यांना चांगले परिचीत आहे. त्यांच्या कामाचे फडणवीसांनी अनेकवेळा कौतूक केले आहे. युवा नेता म्हणून त्यांची वैचारीकता व भविष्यातील ध्येय, धोरणे, वाटचाल आपण जाणून आहात. त्यामुळे असा अभ्यासून नेता आपल्या पाठिंब्याने विधिमंडळात गेला तर आपल्या सोबत अधिक जोमाने काम करेल त्यामुळे सत्यजित तांबे यांना पाठिंब्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सकारात्मक विचार करून तात्काळ पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी प्रतिक जाजू व युवावर्गाच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here