Tuesday, January 18, 2022

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina Nehwal) (३१) सलग गेममध्ये ३४ मिनिटांत नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोडने (Malvika Bansod) हरवून विक्रम केला आहे. सायनाने २०१० मध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिला पराभूत करणारी मालविका दुसरी भारतीय खेळाडू आहे, त्यामुळेही हा विजय महत्त्वाचा आहे. याआधी २०१७ मध्ये पी. व्ही. सिंधूने सायनाला पराभूत केले होते. या विक्रमात मालविकाच्या मेहनतीसोबत तिची आई डॉ. तृप्ती बनसोड यांचा त्याग आणि प्रशिक्षक संजय मिश्रा यांच्या प्रशिक्षणाचे सर्वात मोठे योगदान आहे.

डेंटिस्ट डॉ. तृप्ती यांनी मुलीच्या प्रशिक्षणासाठी फक्त घरच नव्हे तर डॉक्टरचा पेशाही सोडला. मालविका रायपूरमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय मिश्रांकडे प्रशिक्षण घेते. मुलीच्या सरावादरम्यान तृप्ती रोज ६ ते ९ तास बॅडमिंटन हॉलमध्ये बसतात. मुलीला खेळात मदत करण्यासाठी तृप्ती यांनी डेंटिस्टचे (बीडीएस) शिक्षण घेतल्यानंतर स्पोर्ट‌्स सायन्समध्ये मास्टर्सची पदवी घेतली.

मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोडही नागपूरमध्ये डेंटिस्ट आहेत. मालविकाने कनिष्ठ गटात अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले. या काळात संजय मिश्रा मालविकाचे प्रशिक्षक होते. २०१८ मध्ये सीनियर झाल्यानंतर मालविका त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ शकत नव्हती, कारण संजय हे रायपूरचे आहेत. तिच्या प्रशिक्षणासाठी तिची आई २०१६ मध्ये तिच्यासोबत रायपूरला शिफ्ट झाली. मालविकाने २०११ पासून बॅडमिंटन खेळणे सुरू केले.
“मी जास्तीत जास्त काळ तिच्यासोबत असते. माझ्या या त्यागामुळे मालविकाने देशाला पदक मिळवून दिले तर माझ्यासाठी त्यापेक्षा मोठे काहीही असणार नाही.’ असे मालवीकाच्या आई डॉ. तृप्ती यांनी सांगितले. क्वार्टर फायनलमध्ये मालविकाची लढत आकर्षी कश्यपशी होईल.

प्रशिक्षक संजय मिश्रा म्हणाले, सायना समोर असल्याने या सामन्याच्या आधी मालविकाही दबावात होती. दबाव घेऊन कोर्टवर जाऊ नको, एवढेच मी तिला म्हटले होते. मालविकाने हीच रणनीती अवलंबली आणि चांगल्या व्यूहरचना करत खेळली. मालविकाने दीर्घ रॅलीचा खेळ केला, शटल कोर्टवर ठेवले आणि निगेटिव्ह गुण टाळले. त्यामु‌ळेच ती सायनाला हरवू शकली. ही मोठी कामगिरी आहे. मी सायना नेहवालला पाहतच बॅडमिंटन खेळणे सुरू केले होते. ती माझी आदर्श आहे मालविका बनसोडने विजयानंतर प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter