Wednesday, July 21, 2021

खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त? ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे. रस्त्याला खड्डेच खड्डे पडल्याने तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या खड्यात पाणी साचलेले आहे. परिणामी वाहन चालकाला गाडी चालवताना खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव जास्त आहे. हा रस्ता खांडगाव पासून निमज-धांदरफळ -निमगाव पागा व शेवटी पेमगिरीला जातो. एकूण 20 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे.

या रस्त्यावर प्रामुख्याने स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरी येथे वटवृक्ष व शहागडावर येणार्‍या पर्यटकांची वर्दळ जास्त असते तसेच ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी दररोज ये-जा करणार्‍या प्रवाश्याना खराब रस्त्यामुळे व वेळेत कामावर न पोहोचल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पेट्रोल बरोबर ग्राहकांकडून टॅक्स वसुल करणारे, तसेच नवीन गाडी विकत घेतानाही रोड टॅक्स घेतला जातो मग नागरिकांच्या मूलभूत सुविधांच रक्षण कोणी करायचं असा प्रश्‍न एखाद्याला पडल्यास त्यात नवल वाटायला नको. खड्डे पडलेल्या रस्त्यावर कधी कधी भयानक अपघात होऊ शकतात याची जबाबदारी कोण घेणार?

प्रत्येक वेळी रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते त्यामुळे रस्ता पुन्हा लवकरच खराब होतो. प्रशासनातील संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा रस्त्यावर पडलेल्या खड्यावर वृक्षारोपण करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा कार्यकर्ते इंजि.आशिष कानवडे, क्रांतीसेनेचे युवराज सातपुते, अमित कोल्हे, बाळासाहेब भोर यांनी दिला आहे.प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाश्याच्या जीवाशी खेळू नये. येत्या काही दिवसात खांडगाव ते पेमगिरी हा रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत क्रांतीसेनेच्या वतीने पाठपुरावा सुरूच राहील अशी माहिती बाळासाहेब भोर यांनी दिली.

गोरगरीब जनता आधीच, कोरोना सारख्या महामारी मुळे अडचणीत आहे, त्यात पेट्रोल डिझेल दरवाढ, आणि रस्त्याची दुरवस्था झाली यामुळे वाहनाचे नुकसान आणि शारीरिक वेदना वाढत आहेत, अपघात ही होत आहेत प्रशासन ने त्वरित कारवाई करून लवकरात लवकर काम सुरू करावे सामान्य जनतेच्या उद्रेकाची वाट बघू नाही.
-इंजि. आशिष कानवडे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

प्रा. प्रमोदा पात्रो यांना मॅथेमॅटिक्स विषयात पीएच. डी. प्रदान 2 पेटंट प्रकाशित करणार्‍या डॉ. पात्रो यांना यंग रिसर्चर पारितोषिक

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिअनिरिंग सायन्स विभागातील प्रा. प्रमोदा पात्रो यांना कोनेरू लक्ष्मैया शैक्षणिक प्रतिष्ठान ,...

खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त? ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे....

राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक

राजूर (विलास तुपे )राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,...

नानासाहेब वर्पे उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित ; उद्योग व सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणार्‍या विविध मान्यवरांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने यशस्वी उद्योजकांना दरवर्षी भारतरत्न जेआरडी टाटा उद्योग पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात; पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गोंधळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. नुकताच...