बबनराव घोलप यांच्या राजीनाम्याने शिवसेनेत खळबळ

शिर्डीत पेच

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शिवसेनेचेचे उपनेते आणि शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी काल रविवारी अचानक आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नाशिक बरोबरच शिर्डी लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत घरवापसी केल्यामुळे व त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याने बबनराव घोलप यांनी पक्षाला जोरदार झटका दिला आहे. तर या निर्णायानंतर त्यांचे समर्थक शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे वाकचौरे समर्थकांनी मात्र याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.


माजी मंत्री बबनराव घोलप हे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची पुनर्बांधणी करीत होते. तर महाआघाडी विजयाची खात्री बाळगत होती. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांना रविवारी मोठा धक्का बसला.
एकीकडे काल रविवारी जळगावमध्ये उध्दव ठाकरे यांनी मोठी सभा घेऊन मंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का दिला. तर दुसरीकडे शिर्डीतून त्यांना मोठा धक्का बसला. ठाकरे यांच्या संगमनेर – शिर्डी दौर्‍यावर सोबत असणारे व निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे तसेच शिवसेनेच्या पडझडीच्या काळातही साथ न सोडणारे बबनराव घोलप यांच्यावर पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती. मात्र भाऊसाहेब वाकचौरे पक्षात पुन्हा आल्याने सर्व चित्र पलटी झाले. दरम्यान शिवसेनेसोबत गद्दारी करत काँग्रेस नंतर भाजपची साथ केलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यासाठी अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध होता. हा विरोध डावलून पक्षाने वाकचौरे यांची उमेदवारी जवळपास नक्की केली आहे. त्यामुळे बबनराव घोलप आणि त्यांचे समर्थक पदाधिकारी, शिवसैनिक नाराज आहे.
दरम्यान आपल्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलतांना बबनराव घोलप यांनी पक्ष नेतृत्व व पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर टिका केली. पक्षाच्या पडझडीनंतर मला शिर्डीतून तयारी करण्यास सांगितली. त्यानुसार मी मतदार संघात 35 नविन शाखा सुरू केल्या. निष्क्रिय पदाधिकारी बदलले मात्र त्याला मातोश्रीकडून स्थगिती मिळाली. तरीही आपण काम सुरू ठेवले. उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौर्‍यातही आपल्याला डावलले गेले. या दौर्‍याची कल्पाना दिली गेली नाही. तसेच त्याठिकाणी नार्वेकर हे जाणीवपूर्वक भाऊसाहेब वाकचौरे यांना पुढे -पुढे करतांना दिसले. तसेच माझे शिर्डी संपर्क प्रमुखपदही काढून घेण्यात आले. त्यामुळे आपण काम कसे करणार असे म्हणत आपण व्हॉटस्अ‍ॅपद्वारे उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. शिवसेनेतील या घडामोडीने महाआघाडीलाही धक्का बसला. घोलप यांनी बंडखोरी केली तर शिवसेनेची मोठी अडचण होणार आहे.

बबनराव घोलप यांनी दिलेल्या उपनेते पदाचा राजीनामा पक्षासाठी धक्कादायक आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांना भेटीची वेळ दिली असून या बैठकीत काय निर्णय होणार यांच्याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे. आम्ही पदाधिकारी बबन नाना घोलप यांच्या सोबत असून आम्ही पक्षातच राहून बबन घोलप घेतील तो निर्णय मान्य करून काम करू .
-अमर कतारी, संगमनेर शहर प्रमुख (उबाठा)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख