Saturday, May 1, 2021

अविनाश बळवंत कुलकर्णी : संगमनेरच्या ओंकार कुलकर्णीची हॉरर वेब सिरीज 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

संगमनेर एक ऐतिहासिक गाव आहे तसेच आपल्या संगमनेर शहराला कलेचा एक वेगळा वारसा लाभला आहे. आपल्या गावातून अनेक कलाकार घडत असतात. असाच एक कलाकार संगमनेर मधून घडत आहे. येत्या 28 एप्रिल २०२१ ला MX Player या OTT चॅनेल वर एक नवीन मराठी हॉरर वेब सिरीज प्रदर्शित होत आहे. महत्वाचं म्हणजे ही सिरीज संगमनेरच्या एका तरुणाने बनवली आहे. अविनाश बळवंत कुलकर्णी हे कोणाचं नाव नसून या सिरिजचे नाव आहे. नावातच एक वेगळेपण जाणवते. ही सिरीज लिहिली आणि दिग्दर्शन केली आहे ओंकार रविंद्र कुलकर्णी याने. ओंकार एक उत्तम कलाकार तसेच लेखक आहे.

Omkar Kulkarni

ओंकारने शालेय शिक्षण दिगंबर गणेश सराफ विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्याने अमृत वाहिनी इंटरनेशनल स्कूलमध्ये डान्स टिचर म्हणून सुद्धा काम केले. ओंकार कुलकर्णी हा उत्तम कविता देखील करतो. शालेय जीवनात अनेकदा चालू वर्गात कविता लिहीत बसल्यामुळे त्याने शिक्षकांचे बोलणेही खाल्ले आहे. तरी त्याची कला त्याने जोपासली.


ओंकारचे वडील रविंद्र कुलकर्णी संगमनेर शहर पोलीस डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहेत, त्यांची सेवा ही अविरत सुरू आहे. त्यातून ओंकारने एक मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळे स्थान निर्माण करायचे ठरवले आणि ही एक नवीन वेबसिरीज त्याने तयार केली. हे काम करत असताना त्याला बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागले, तरी तो थांबला नाही. सर्वेश सुभाष जोशी आणि वंदना वसंत बंदावणे यांची त्याला मदत लाभली. त्याची पोच पावती म्हणजे त्याने केलेली सिरीज ही एक हॉरर वेब सिरीज असून आता पर्यंत मराठीमध्ये अशी कलाकृती फार कमी पाहायला मिळाली आहे. लेखन करताना ओंकार ने खूप बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून बारकाईने लिखान केले आहे. दिग्दर्शन सुद्धा फार महत्त्वाचे असते, त्यात सुद्धा पूर्ण मेहनत घेऊन ओंकारने अथक परिश्रम करून ही कलाकृती तयार केली. खूप उत्तम अशी कलाकृती तयार झाली असून सर्वांनी सहकुटुंब पाहू शकतो. या वेबसिरीजचे पोस्टर रिलीज झाले असुन ते उत्सुकता निर्माण करणारे आहे.


ओंकार समोर कलाकारांना घेऊन काम करणे हे आव्हान होते, कारण सर्व कलाकार नवोदित पण तरी ही सगळ्यांनी खूप छान अभिनय यात केला. सामंजस्य दाखवून ओंकारने आपल्या उत्तम दिग्दर्शनातुन या नवकलाकारांकडून अभिनय करून घेतला.
या वेब सिरीजचे छायाचित्रण दुर्गेश आहेर याने केले. उत्तम प्रकारे कॅमेराचा वापर कारण्यात आला. तसेच याचे संगीत सुद्धा खुप उत्तम असून अंगावर शहारे आणणारे आहे. संगीत मुसिक, निखिल, कमलाकर, नेरकर यानी दिले आहे. गायन अनुजा अनंत सराफ हिने केले आहे . या सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत आदित्य गोडसे, श्रद्धा महाजन ,कल्पना सारंग, साक्षी खैरनार, विकास गिरी , सुरेश शिंदे , दिग्विजय नवले , समृद्धि दिवटे , हे सर्व कलाकार आहेत.
आपल्या संगमनेरी तरुणाने केलेलीं ही वेबसिरीज सर्वांनी आवर्जून पहावी. ओंकार रवींद्र कुलकर्णी याला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,904चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब...

आपले सरकार पोर्टलवर पोलीसांची बदनामी; दारुबंदी कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील दारुबंदी कार्यकर्त्याने पोलीस आपल्या मागणीची दखल घेत नसल्याने तसेच दारु विरोधी आवाज...

वखार महामंडळाच्या गोदामाची आग दोन दिवस धगधगतीच : वखार महामंडळ अधिकार्‍यांचा अक्षम्य बेफीकरपणा व दिरंगाई ; आगीचे कारण गुलदस्त्यातच

संगमनेर (प्रतिनिधी)मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला भीषण...

अवश्य वाचा : डॉक्टरांचे संगमनेर-अकोलेच्या नागरिकांना पत्र !!

सर्व सन्माननीय नागरिकांना नमस्कार,आज 5 मिनिट वेळ काढून बोलतोय.थकलोय हो आता. 24 तास कोविड पेशंटची सेवा करतोय.शारीरिकदृष्ट्या...

महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण परंतु १८ ते ४४ वयोगटाला लगेच लसीकरण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला असून राज्यात सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय...