Tuesday, January 18, 2022

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा फायदा उचलत खासगी वाहन चालकांनी लुट चालविली आहे. प्रवाशी जनता हतबल आहे. तर हा संप करणारे कर्मचारीही आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. सरकारने या संपाची दखल घेतली असून अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. अजुनही करतील, परंतू कर्मचार्‍यांनी आता तुटेपर्यंत ताणू नये. कामावर हजर व्हावे त्यातच कर्मचार्‍यांचे हित आहे. असे अवाहन संगमनेर बस अगारप्रमुख निलेश करंजकर यांनी केले आहे.

Nilesh Karanjkar

एसटी संपाच्या पार्श्‍वभुमीवर काल दैनिक युवावार्तामध्ये गिरणी कामगारांच्या संपाचा हवाला देऊन एसटी कर्मचार्‍यांनी ताठरपणा सोडून न्यायालयावर व सरकारवर विश्‍वास ठेवून कामावर परतावे असे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत संगमनेर बस आगार प्रमुख निलेश करंजकर यांनी दै. युवावार्ताशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले या संपामुळे अनेक एसटी कर्मचारी संकटात सापडले आहे. कामावर नसल्याने तसेच कारवाई होण्याच्या शक्यतेने या कर्मचार्‍यांना कोणीही कर्ज देत नाही. त्यामुळे कुटूंबाचा भार, मुलांचे शिक्षण, आरोग्य हे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहे.

शासनाने कर्मचार्‍यांच्या मागणीची दखल घेतली आहे. 40 टक्के पगारवाढ केली आहे. काही विषय न्यायालयात प्रलंबीत आहे. त्यावर निर्णय होणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील शेवगाव आगार शंभर टक्के, कोपरगाव आगार 70 टक्के, तारकपूर आगार सुद्धा सुरू झाले आहे. अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार आहे परंतू इतर कर्मचारी त्यांना आटकाव करत आहे. अनेक कर्मचार्‍यांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. त्यांना या संपामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


त्यामुळे कर्मचार्‍यांनी कामावर हजर होण्यातच त्यांचे भले असून जे कर्मचारी कामावर परतणार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. कर्मचार्‍यांनी धीर धरावा. मोठा अनर्थ टाळण्याआधी सावध व्हावे व ‘प्रवासी हिताय प्रवासी सुखाय’ हे ब्रिदवाक्य प्रत्यक्ष अमलात आणावे असे आवाहन आगार प्रमुख निलेश करंजकर यांनी एसटी कर्मचार्‍यांना केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter