Tuesday, January 18, 2022

आशियाई हॉकी स्पर्धा : जपानचा धुव्वा उडवत भारताची विजयाची हॅट्रिक ; उपांत्य फेरीत स्थान पक्के

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या राउंड रॉबिन सामन्यात भारताने चक्क अर्धा डझन गोल केले. गतविजेत्या भारताने आशियाई चॅम्पियन जपानचा ६-० अशा गोल फरकाने धुव्वा उडवला. रविवारी ढाका येथील मौलाना भासानी हॉकी स्टेडियमवर भारतीय संघाने गोलचा पाऊस पाडला.

उपांत्य फेरीत स्थान पक्के करणाऱ्या भारतीय संघाने विजयाची हॅट‌्ट्रिक केली. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा ३-१ आणि त्याआधी बांगलादेशचा ९-० असा पराभव झाला होता. भारताचा पहिला सामना दक्षिण कोरियासोबत २-२ असा बरोबरीत सुटला होता. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. सहा संघांच्या या स्पर्धेत ५ संघ सहभागी होत आहेत. मलेशियाने माघार घेतली. भारत १० गुणांसह पहिल्या तर कोरिया ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक २० गोल केले, तर त्यांच्याविरुद्ध केवळ ३ गोल झाले. या वर्चस्वपूर्ण विजयामुळे भारताचे मनोबल लक्षणीयरीत्या उंचावेल. परिणामी त्यांना चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्यास मदत होईल.

सामन्यात हरमनप्रीतसिंगने २ तर दिलप्रीतसिंग, जर्मनप्रीतसिंग, सुमीत आणि समशेरसिंग यांनी प्रत्येकी १ गोल केला. हरमनप्रीतने या स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल केले. रविवारी भारताने २०१८ आशियाई सुवर्ण विजेत्या जपान संघाचा सर्व विभागांमध्ये पूर्णपणे पराभव केला. पहिल्या हाफपासूनच भारताने वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरच्या पहिल्या ६ मिनिटांत संघाला २ पेनल्टी कॉर्नर मिळाले, तरीही त्याचा फायदा संघाला करता आला नाही. त्यानंतर लगेच जपानही पेनल्टी कॉर्नरवर अपयशी ठरला. आक्रमक खेळ करत भारतीय संघाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि १० व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल केला.

२३ व्या मिनिटाला दिलप्रीतने मैदानी गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानने आक्रमण सुरूच ठेवले, मात्र ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाच्या बचावाने त्यांना रोखून धरले. जपानला उत्तरार्धात आक्रमक खेळूनही फायदा झाला नाही. जरमनप्रीतने ३४ व्या मि. गोल करत आघाडी ३-० केली. ३६ व्या मि. जपानचा पेनल्टी कॉर्नर गोलरक्षक सूरज केरकेराने तो उत्कृष्ट पद्धतीने रोखला. भारताने अखेरच्या ८ मिनिटांत ३ गोल केले. सुमीतने ४६ व्या मि., हरमनप्रीतने ५३ व्या मि. पेनल्टी कॉर्नरवर व ५४ व्या मि. समशेरने मैदानी गोल केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter