Tuesday, January 18, 2022

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानला नमवत कोरले कांस्यपदकावर नाव

मुंबई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अखेरच्या मिनिटापर्यंत चांगलाच रंगला होता. पण अखेर भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवत पदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या हॉकी संघाने पाकिस्तानवर धडाकेबाज विजय मिळवत आपल्या चाहत्यांना आज एक आनंदाची बातमी दिली.

भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला, त्यामुळेच त्यांना पहिल्याच मिनिटाला तीन पेनेल्टी कॉर्नर मिळवता आले. भारताच्या मनप्रीत सिंगने त्यानंतर दुसऱ्या मिनिटांला मिळालेल्या पेनेल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये केले आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. भारताने काही काळ ही आघाडी कायम ठेवली होती. पण पहिल्या सत्राच्या अखेरीस पाकिस्तानने गोल केला आणि भारताबरोबर १-१ अशी बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तानकडून हा गोल अफरोझने केला. दुसऱ्या सत्रात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी गोल करण्याच प्रयत्न केले खरे, पण त्यांना यामध्ये अपयश आले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत हा सामना १-१ असा बरोबरीत राहीला होता. तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या संघाने जोरदार आक्रमण केले आणि त्याचा फायदा त्यांना झाल्याचे पाहायला मिळाले. कारण तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनेल्टी कॉर्नरवर गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडेलला भारतीय संघ त्यांना जास्त आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताने त्यानंतर दोन गोल करत दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

भारतीय संघ या स्पर्धेसाठी जेतेपदाचा दावेदार समजला जात होता. पण या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला जपानकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने जपानला ६-० असे पराभूत केले होते. पण जपानने उपांत्य फेरीत या पराभवाचा बदला घेतला आणि भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंगल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर आज झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मात्र भारताने दमदार कामगिरी केली आणि या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter