Tuesday, January 18, 2022

लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्याकडे COSC पद ; CDS होण्याचा दावा बळकट

General_Manoj Mukund Naravane

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) चे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यांना देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बनवले जाईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु या दरम्यान बुधवारी त्यांच्याकडे COSC चे पद सोपवण्यात आले. 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या अकाली निधनानंतर तिन्ही सेवांच्या प्रमुखांचा समावेश असलेल्या समितीचे अध्यक्षपद रिक्त होते.

नवीन सीडीएसबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. परंतु जनरल नरवणे हे तिन्ही सेवेतील सर्वात वरिष्ठ प्रमुख असल्यामुळे COSC चे अध्यक्ष बनले आहेत आणि त्यामुळे पुढील CDS होण्याचा त्यांचा दावा बळकट झाला आहे.
IAF प्रमुख एअरचीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी 30 सप्टेंबरला, तर नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी 30 नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. याउलट जनरल नरवणे यांना लष्करप्रमुख होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत. 61 वर्षीय जनरल नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी जनरल बिपिन रावत यांच्या निवृत्तीनंतर आणि देशातील पहिले CDS म्हणून प्रमोशननंतर लष्करप्रमुख (COAS) म्हणून पदभार स्वीकारला होता.

COSC ही तीन सेवांच्या प्रमुखांचा समावेश असलेली एक समिती आहे, जी तीन सेवांमध्ये ऑपरेशन्स आणि इतर समस्यांबाबत समन्वय राखण्यासाठी काम करते. सीडीएस पद निर्माण होण्यापूर्वी जी परंपरा होती, त्याच जुन्या परंपरेनुसार जनरल नरवणे यांना सीओएससीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. या परंपरेनुसार, तिन्ही सेवांच्या प्रमुखांपैकी सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याची COSC चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात येत होती.

देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात दुःखद निधन झाले होते. यावेळी ते आपली पत्नी आणि 12 इतर लष्करी अधिकाऱ्यांसह तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये एका कार्यक्रमात जात होते. त्यांचे MI-17V5 हेलिकॉप्टर लँडिंग साइटच्या अवघ्या 7 किमी आधी अचानक जंगलात पडले. या अपघातात जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 अधिकारी जागीच शहीद झाले होते. तर एकमेव जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचा 8 दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी रुग्णालयात मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

कामावर हजर होण्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे भले आहे – संगमनेर आगार प्रमुख निलेश करंजकर

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपाचा...

तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच : निवृत्तीमहाराज इंदोरीकर ; तृप्ती देसाई यांनी घेतला आक्षेप

‘मी माळकरी आहे म्हणून मला करोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना करोना गाठणारच,’ असे वक्तव्य इंदोरीकरांना कीर्तनातून...

बॅडमिंटन : ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला नागपूरकर मालविकाने केले पराभूत ; सायना नेहवालला पराभूत करणारी ठरली दुसरी भारतीय महिला

इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर (YonexSunriseIndiaOpen2022) फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (Saina...

एसटी कर्मचाऱ्यांनो, गिरणी कामगार होऊ नका! तुटे पर्यंत ताणू नका, कर्मचार्‍यांना नागरीकांचे आवाहन

संगमनेर (संजय आहिरे)केवळ कामगार क्षेत्रावरच नव्हे, तर संपूर्ण मुंबई व महाराष्ट्रावर अतिशय दूरगामी परिणाम करणारी घटना म्हणजे...
web counter