Sunday, June 4, 2023

सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडे मुबलक निधी – ना. पटेल

ना. पटेल

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचे केंद्रिय राज्यमंत्र्यांच्या हस्ते व महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन

युवावार्ता – (प्रतिनिधी)
संगमनेर – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अशी माहिती देशाचे अन्नप्रक्रिया उद्योग व जल शक्ती केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज येथे दिली.
संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत च्या राष्ट्रीय महामार्ग क्र 60 घुलेवाडी ते संगमनेर रस्ता तसेच राज्यमार्ग क्र. 71 अ राष्ट्रीय महामार्गाच्या 60 किलो मीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याहस्ते आज संगमनेर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेंद्र गोंदकर, डॉ. अशोक इथापे, भैय्या परदेशी, शरिष मुळे, श्रीराज डेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री.पटेल म्हणाले, देशात गावा-गावांना जोडणारे पक्के रस्ते निर्माण झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान सडक योजनेमुळे देशात रस्त्यांचे पथदर्शी काम झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशाला नवीन 20 योजना दिल्या आहेत. त्यामाध्यमातून देशात मुलभूत व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 2 किंवा 3 स्थानी असणार आहे.


अन्न प्रक्रिया व जलशक्ती मंत्रालयाचे बजेट 60 हजार कोटींचे आहे. यातील 10 हजार कोटी अन्न प्रक्रिया उद्योगांना मदतीसाठी खर्च केले जाणार आहेत. जलजीवन मध्ये प्रत्येक व्यक्तीला 2024 पर्यंत प्रती दिवस 55 लीटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जलजीवनमध्ये आतापर्यंत 18 हजार कोटी खर्च करण्यात आला आहे. लोकांना योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांच्या समस्या ही समजून घेतल्या जात आहेत. असेही श्री.पटेल यांनी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमुळे देश काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत प्रगतीच्या महामार्गावर आहे. देशात रस्ते, रेल्वे व पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. असे मत राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. संगमनेर येथील या राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांसाठी केंद्र सरकारने 24 कोटी 56 लाख व राज्य सरकार 7 कोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्याच्या विकासासाठी केंद्राच्या निधीचे मोठे योगदान असते. असे मतही महसूलमंत्री श्री.विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे. या नेतृत्वाने देशासह परदेशात आपली नवी ओळख दबदबा निर्माण केला आहे. आज जगातला कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर पहिले आपल्या देशाला विचारले जाते किंवा विश्‍वासात घेतले जाते. सर्वसामान्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या, त्याची प्रभावी अमलबजावणी केली. त्यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळाला. तर दुसरीकडे ज्यांना आपला पक्ष जोडून ठेवता आला नाही ते आज भारत जोडो यात्रा काढत आहे. काँग्रेसने सत्तेसाठी देशविघातक शक्ती सोबत हात मिळवणी केलेली आहे अशी खरमरीत टिका केंद्रीय राज्यमंत्री ना. पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

इंटेलिजन्स : लाभदायक की हानीकारक

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या क्षेत्रात नकारात्मक शक्यतांविषयी तज्ञ लोकांचे भाकित(लेखक...

संगमनेरात आक्रोश, तालुका बंदसह मोर्चाचे आयोजन

मंगळवारी एकवटणार हिंदू समाज, अत्याचार रोखण्याचे आवाहनविविध संघटनाच्या सहभागातून...

जनतानगरमध्ये महिलेसह चौघांना मारहाण

मारहाणीत कोयता फायटर व गजाचा वापरमारहाणीत ६ अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल

संगमनेर मर्चंट्स बँक निवडणूकीत अखेरच्या क्षणी एकोप्याचे दर्शन

व्यापार्‍यांच्या कामधेनूत राजकारण टाळून बिनविरोधचा रचला इतिहासयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर - बँकेचे संस्थापक स्व.ओंकारनाथजी मालपाणी...

स्वीफ्ट कार व दुचाकीची जोराची धडक

कारच्या धडकेत युवक ठारयुवावार्ता (प्रतिनिधी)संगमनेर- नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा येथे दुचाकीस्वार गतीरोधकावरून जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने...