
पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली लावला होता बाॅम्ब
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक व पंजाब दहशतवादी विरोधी पथकाची संयुक्त कारवाई
शिर्डी (प्रतिनिधी )
पंजाबमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीखाली बॉम्ब लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयीत आरोपीला शिर्डी येथून अटक करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजले जाणाऱ्या शिर्डी येथील हॉटेल गंगा येथून काल रात्री १० ते ११ च्या दरम्यान हि अटक करण्यात आल्याने शिर्डीसह नगर जिल्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने एकत्र कारवाई या संशयीत आरोपीस शिताफीने अटक केली आहे. राजेंदर असे या दहशतवाद्याचे नाव आहे. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर येथे समुद्राच्या किनारी संशयित बोट आल्याने एकच खळबळ माजली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे बोटीत काही शस्त्रास्त्रांचा साठादेखील सापडला. समुद्रामार्गे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता पाहता, रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असताना शिर्डीतील ही घटना उघड झाली आहे. या आधीच शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र अतिरेक्यांच्या रडारवर असताना ही घटना त्यातील धोका अधोरेखित करत असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने एकत्रितपणे कारवाई करत या संशयीत आरोपीस शिताफीने अटक केली आहे.

दि.१६ ऑगस्ट रोजी पंजाब मधील पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीला आई.ई.डी.(IED) लावून उडवण्याचा कट आखला होता. यावर पंजाब एटीएस आणि महाराष्ट्र एटीएस विरोधी पथकाने एकत्र कारवाई करत शिर्डी पोलिस उपविभागीय पोलिस अधीकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, पोलिस उपनिरीक्षक माळी, पोलिस कॉन्स्टेबल अंधारे, शेलार, सानप यांनी या कारवाईत सहभाग घेत राजेंदर यास शिर्डी तील साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हाँटेल गंगाच्या खोली क्रमांक ३१२ मधून रात्री अटक केली आहे. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान या घटनेबाबत शिर्डीसह राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
