कंत्राटी कामगाराचा पगार काढण्यासाठी घेतली तीन हजारांची लाच ; लाचलुचपतच्या सापळ्यात अडकले खासगी कंपनी दोन कर्मचारी

संगमनेर (प्रतिनिधी)
वीज वितरण कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करणार्या एका कामगाराचा पगार काढण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिपत्याखाली असणार्या एका खासगी कंपनीच्या व्यवस्थपक व लिपीकाने तीन हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने आज संगमनेर येथे छापा टकून सदर कंपनीच्या या खासगी कर्मचार्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक (नाशिक) सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी करण्यात आली.

शहरातील एक इलेक्ट्रीकल्स कंपनी शासनाकडे नोंदणीकृत कंपनी आहे. महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचार्यांचे पगार या कंपनीच्या माध्यमातून केले जातात. दरम्यान सदर तक्रारदार हा महावितरणच्या संगमनेर विभागात बाह्यस्त्रोत कर्मचारी म्हणून सप्टेंबर 2018 पासून कार्यरत आहे. या कर्मचार्यासह या खासगी कंपनीच्या अधिपत्याखाली सुमारे 400 कर्मचारी कार्यरत आहे. दरम्यान तक्रारदार इसमाचे जुन महिन्याचे पगार काढण्यासाठी या कंपनीतील व्यवस्थापक सुनिल पोपट पर्बत (रा. निंबाळे, ता. संगमनेर) आणि लिपीक सुजाता तेजस कांबळे (रा. मालदाड रोड, संगमनेर ) यांनी तक्रारदार इसमाकडे 3 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. अगोदरच कमी पगार त्यात पगार काढण्यासाठी मध्यस्थीला 3 हजार रूपये द्यावे लागत असल्याने त्रासलेल्या या कर्मचार्‍याने थेट नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसर नगरचे पोलिस उपाधिक्षक खेडकर यांनी या तक्रारीची दखल घेतली. त्यानुसार योजना करून आज बुधवारी या कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. ठरल्या प्रमाणे तक्रारदार या दोघांना ठरलेली रक्कम देत असतांना लाचलुचपत्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.

यावेळी आरोपींकडून लाचेचे तीन हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हि कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपतचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक हरीष खेडकर, पो.नि. शरद गोर्डे, पो.अं. वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हरुण शेख यांच्या पथकाने केली.
संगमनेरात कंत्राटी कर्मचार्‍याचे पगार काढण्यासाठी महावितरणने प्राधिकृत केलेल्या खाजगी कंपनीने लाच घेतली याप्रकारे या कंपनीकडे शेकडो कर्मचारी असून त्यांच्याकडून अशा पध्दतीने पगार काढण्यासाठी लाच घेतली जात असेल तर ही रक्कम प्रतीमहिना काही लाख रुपये आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख