Thursday, July 22, 2021

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून रोखले 70 बालविवाह ; कायदे कठोर व्हावेत मोठी चळवळ उभी करणार

संगमनेर (प्रतिनिधी)
सरकारने कायदा करून व जनजागरण करूनही अजूनही अनेक ठिकाणी बालविवाह केले जातात. कोरोना काळात काही निर्बंध आल्यानंतर अनेक ठिकाणी बालविवाह करण्यात आले. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासनाच्या सहकार्याने औरंगाबाद, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात कोरोना काळात आतापर्यंत 70 बालविवाह रोखण्याचे मोठे काम केले. बालविवाह पूर्णपणे रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायद्यात मोठा बदल करावा तरच अशा घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने व्यक्त केली जाते आहे.

सन 2016 ते आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अहमदनगर, औरंगाबाद, जालना, ठाणे, उस्मानाबाद, पुणे, नाशिक आणि बीड या जिल्ह्यात साधारण 235 बालविवाह रोखल्याची माहिती समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी दिली. कोरोना काळात बालविवाहाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने राज्यातील काही जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू असून, 135 बालविवाह झाल्याचे त्या माध्यमातून समोर आले आहे. प्रत्यक्षात किती बालविवाह झाले? हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर समोर येईल. माहिती उशिरा मिळाली, अथवा मिळालीच नाही. तसेच काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याने बालविवाह झाले, असेही अ‍ॅड. गवांदे यांनी सांगितले.

कोरोना काळात मुलींचे शिक्षण थांबले. सर्वच गोष्टीत अनिश्‍चितता वाढली आहे. त्यामुळे मुलींचे लग्न करून टाका, हीच मानसिकता काही पालकांमध्ये निर्माण झाली आहे. कोरोना काळात सर्वच गोष्टी मर्यादित झाल्या. कोरोनाच्या आधी एखाद्या गावात बालविवाह होणार असल्याची माहिती तत्काळ मिळायची. मात्र, आता विवाह सोहळ्यांसाठी मर्यादा आल्याने अनेकांनी गुपचूप बालविवाह उरकले. असे गुपचूपे झालेल्या विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे.
त्याचबरोबर शिक्षणाचा अभाव, कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी, आर्थिक अडचणी यातूनदेखील बालविवाह लावून दिले जात आहेत. असेही निरीक्षण अ‍ॅड. गवांदे यांनी नोंदविले आहेत. बालविवाह रोखण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रभावीपणे काम करत आहे. मात्र, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण, सामाजिक न्याय आणि शिक्षण यांनी सतर्कता ठेवून बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे

चळवळ उभी करणार

बालविवाह करणे म्हणजे मुलींचे लैंगिक शोषण करण्यासारखे आहे. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी काम होणे गरजेचे आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यात बदल व्हावा, कायदे कठोर व्हावेत, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोठी चळवळ उभी करणार असल्याचे समितीच्या राज्य सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील दोन आणि कौठे कमळेश्‍वर येथील एक असे एकूण तीन बालविवाह मे महिन्यात रोखले होते. अल्पवयीन मलींचे आई-वडिल अशिक्षित असल्याने त्यांना कायद्याचे ज्ञान नसल्याने त्यांना त्याबाबत कल्पना दिली होती. बाल विवाह करणार नसल्याचे त्यांनी मान्य केल्यानंतर तसे लेखी दिले होते. यापूर्वी संगमनेर तालुक्यात शासन व अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडूनअनेक बालविवाह रोखले आहेत.
सुरेश शिंदे, (गटविकास अधिकारी पंचायत समिती, संगमनेर)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उच्चांक; जिल्ह्यात 789 रुग्ण तर संगमनेर तालुक्यात 66 नवे रुग्ण

संगमनेर (प्रतिनिधी)मागील दिड वर्षापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. दुसरी लाट ओसरली म्हणताना आता पुन्हा एकदा जिल्ह्यात...

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून रोखले 70 बालविवाह ; कायदे कठोर व्हावेत मोठी चळवळ उभी करणार

संगमनेर (प्रतिनिधी)सरकारने कायदा करून व जनजागरण करूनही अजूनही अनेक ठिकाणी बालविवाह केले जातात. कोरोना काळात काही निर्बंध...

प्रा. प्रमोदा पात्रो यांना मॅथेमॅटिक्स विषयात पीएच. डी. प्रदान 2 पेटंट प्रकाशित करणार्‍या डॉ. पात्रो यांना यंग रिसर्चर पारितोषिक

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिअनिरिंग सायन्स विभागातील प्रा. प्रमोदा पात्रो यांना कोनेरू लक्ष्मैया शैक्षणिक प्रतिष्ठान ,...

खांडगांव ते पेमगिरी रस्त्याची दुरावस्था, प्रशासनही निद्रिस्त? ; लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा खड्डयामध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना त्याचा फटका बसत आहे....

राजूर पोलीसांचा पोलिस अधिक्षकांकडून सन्मान; गुन्ह्याचा जलद गतीने तपास केल्याने कौतुक

राजूर (विलास तुपे )राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,...