Saturday, September 18, 2021

अमृतवाहिनीच्या 38 विद्यार्थ्यांची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये निवड

संगमनेर (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच विद्यार्थी ज्ञानाबाबत स्वयंपूर्ण होऊन त्यास व्यवसायाभिमुख व रोजगाराभिमुख शिक्षण अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय संगमनेर येथे मिळते. याची खात्री आल्याकारणाने रायातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी अमृतवाहिनीत प्रवेश घेण्यासाठी कायम इच्छुक असतात. विद्यार्थ्यांचा आतापर्यंतचा प्रोग्रेस रिपोर्ट, तंत्रज्ञान, संभाषण कौशल्य,लीडरशिप क्वालिटी व निर्णय क्षमता या आधारे सर्व निकषांमध्ये अग्रेसर असल्यामुळे अंतिम वर्षाची परीक्षा व निकाला अगोदरच अमृतवाहिनी इंजिनिअरींगच्या 38 विद्यार्थ्यांची इन्फोसिस या जागतिक नामांकित कंपनी कडून वार्षिक 3.6 लाख पॅकेज विशेष निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.व्यंकटेश यांनी दिली आहे.

यामध्ये आय. टी., सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ईटीसी, मेकॅनिकल, प्रोडक्शन अशा सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोना काळातील लॉक डाऊन मध्ये सुद्धा ट्विटर क्लास टीचर व सर्व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांची सतत साधलेला प्रेरणादायी संवाद ही जमेची बाब ठरली आहे. यापूर्वी झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये 47, कॉग्झिटंट मध्ये 42 विद्यार्थ्यांना व इतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

अमृतवाहिनी कॉलेजचे निकाल ,सर्व सोयीसुविधा व विशेष मानांकन यामुळे अनेक दर्जेदार तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज ला विशेष प्राधान्य देत आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ,इन्फोसिस, कॅपजेमिनी, अ‍ॅसेंजर, विजिट ,विप्रो रेनेसास इत्यादी अनेक मोठ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्यंकटेश, उपप्राचार्य ए.के.मिश्रा यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...

हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाजपची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)हुल्लडबाजी करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणार्‍या हल्लेखोर शिवसेना कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे...

संगमनेरात 25 बसचे निर्जंतुकीकरण; अ‍ॅन्टी-मायक्रोबायल ट्रिटमेंटमुळे प्रवाशांचा होणार कोरोनापासून बचाव

संगमनेर (संजय आहिरे)कोरोना महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर...