Wednesday, October 20, 2021

भारताला आणखी एक पदक : स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने कुस्तीच्या ६५ किलो गटात पटकावले कांस्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. हाजी अलीयेव अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला, त्यामुळे बजरंगला रेपेचेजद्वारे कांस्यपदकासाठी लढण्याची संधी मिळाली.

बजरंग उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलीयेवकडून ५-१२ने पराभूत झाला. अलीयेवविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटात बजरंगने एक गुणाने आघाडी घेतली होती. पण, अझरबैजानच्या पैलवानाने बजरंगवर वर्चस्व राखले.उपांत्यपूर्व फेरीत बजरंग ०-१ ने पिछाडीवर होता. यानंतर बजरंगला शेवटच्या मिनिटात २ गुण मिळाले. त्यानंतर त्याने इराणी कुस्तीपटूला सामन्याबाहेर फेकून दिले.

बजरंगने ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली. त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या एर्नाझार अक्मातालीववर विजय मिळवला. बजरंगने एकदा किर्गिस्तानच्या कुस्तीपटूवर ३-१ अशी आघाडी घेतली. अक्मातालीने दोन गुण घेत ३-३ अशी बरोबरी साधली. बजरंगने एकसाथ २ गुण मिळवले होते. या आधारावर त्याला विजेता घोषित करण्यात आले.

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील भारताचे हे सहावे पदक ठरले आहे. तर कुस्तीमधील दुसरे पदक आहे. या पदकासह भारताने ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधिक पदकाची बरोबरी केली आहे. याआधी भारताने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदक जिंकली होती.

ऑलिम्पिकमधील कुस्तीतील भारताची पदके
खाशाबा जाधव, कांस्य पदक- १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक
सुशीलकुमार,कांस्य पदक- २००८ बिजिंग ऑलिम्पिक
सुशीलकुमार,रौप्य पदक- २०१२ लंडन ऑलिम्पिक
योगेश्वर दत्त, कांस्य पदक-२०१२ लंडन ऑलिम्पिक
साक्षी मलिक, कांस्य पदक- २०१६ रिओ ऑलिम्पिक
रवीकुमार दहिया, रौप्यपदक २०२० टोकियो ऑलिम्पिक
बजरंग पुनिया, कांस्यपदक २०२० टोकियो ऑलिम्पिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

ठेकेदाराचा चमत्कार, त्यास महामार्गवाल्यांचा आधार

संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचे ६ वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले आहे. या चौपदरीकरणात २३७३ झाडे तोडण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी संदीप निचित यांनी दिली होती. ती परवानगी देतांना त्यांनी तोडलेल्या झाडांच्या १० पट झाडे येणाऱ्या पावसाळ्यात लावावीत असे आदेश दिले होते. संबंधित ठेकेदाराने ५ वर्षात ती झाडे न लावल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठात याचिका दाखल केली होती.

एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या; संगमनेर हादरले

संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्येच गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे

भारताला मिळाले चौथे सुवर्ण पदक

भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपले चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने SL3 श्रेणीच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या...

बाजारभाव नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी झाला उध्वस्त भाजीपाल्याच्या फडात मेंढरे सोडण्याची वेळ

अकोले(ज्ञानेश्‍वर खुळे)हजारो-लाखोंचा खर्च करुन अपेक्षेने पिकविलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात असल्याने शेतकर्‍यांना भरल्या पिकात मेंढरे सोडण्याची...