शासनाकडून मदतीची गरज…

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती बरोबरच विटभट्टी चालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे कच्या वीटा सुकणे दुरच त्यात पावसाने झोडपल्याने या विटांची माती झाली आहे. त्यामुळे मेहनती बरोबरच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अगोदरच कोरोना लोकडाउनमुळे वीट कामगार आर्ध्यावर काम सोडून गेले. त्यामुळे विटा उत्पादकांचा व्यवसाय ठप्प झाला. नोटबंदी, लॉकडाउन आणि आता अवकाळी पाऊस या संकटामुळे विट उत्पादक पूर्ण कर्जबाजारी झाला आहे. देशात विट धंदा असा एकमेव व्यवसाय आहे की त्याला कुठल्याही प्रकारची सरकारी मदत तर सोडा साधा अवकाळी पाऊस अथवा इतर कारणाने नुकसान झाले तरी सरकारी पंचनामा सुध्दा केला जात नाही. देशातील कुठलीही विमा कंपनी विटभट्टीचा विमा सुधा उतरवित नाही. हिवाळा व उन्हाळ्यात 6 महीने म्हणजे नोव्हेबर ते मे पर्यत तरी विमा योजना लागू करणे गरजेचे असते. पण सरकार ते सुद्धा करत नाही. सरकार विट भट्टी चालकांकडून सर्व कर घेते पण सुविधा मात्र कोणतिही सुविधा मदत देत नाही. या व्यवसायावर लाखो लोकांची उपजीविका आहे. यात आदिवासी, मागासवर्गीय, ज्या लोकांना कुठेही रोजगार मिळत नाही असे लोक विट व्यावसायावर अवलबुन आहे. अवकाळी पावसाने जे नुकसान झाले त्याचे सरकारने पंचनामे करुन किमान चालू वर्षीचे रॉयल्टी व भूपृष्ठ भाडयात सूट देऊन माफ करावी अशी मागणी विट भट्टी चालकांकडून केली जात आहे.
