Wednesday, March 3, 2021

वाटलं होतं गड्या आपला गाव बरा… पण तुम्ही म्हणाले पसारा भरा… – पराभूत उमेदवाराचे अनोखे आभार प्रदर्शन

राज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आणि एकच धुरळा उडाला. यातच यंदा, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक किस्से मोठे रंजक घडले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पतीस खांद्यावर नेणारी पत्नी असो, किंवा जेसीबीच्या फळ्यावरील मिरवणूक असो. विजयी उमेदवाराने आपला विजय साजरा करताना भन्नाट गोष्टी केल्या. मात्र लातूर जिल्ह्यातील पराभूत झालेल्या उमेदवाराच्या बॅनरनं या विजयी उमेदवारांनाही मागे टाकत संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. कारण बॅनरवरील त्या उमेदवाराचं मनोगतच अफलातून आहे.


काय लिहिले आहे बॅनर वर ?
वाटलं होतं गड्या आपला गाव बरा…पण तुम्ही म्हणाले पसारा भरा…आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. समाजाने नाकारल… गावानं नाकारलं, मात्र आम्हाला देश स्वीकारणार…’ पराभवाचे हे शल्य असं लिहून बॅनरवर, आपल्याला मिळालेल्या अवघ्या 12 मतांसाठीही या पठ्ठ्यानं मतदारांचे आभार मानले आहेत. ‘सात जन्म तुमचे हे उपकार विसरणार नाही’, असं लिहलेले बॅनर गावात लावले.
‘तुमच्या मताचे देशात नाव करीन’, असं वाक्यही त्यात आहे. हे बॅनर अल्पावधीतच सोशल मीडियात व्हायरल झालं. संपूर्ण राज्यात ‘त्या’ बारा मतदाराच्या मताचं नाव झालं.

कोण आहे हा उमेदवार –
ही किमया करणारा तरुण आहे लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर येथील विकास शिंदे कोनाळीकर. अहमदपूर इथं त्याचं पॉलिटेक्निकचं शिक्षण सुरु आहे. काही काळासाठी तो पुण्यातही वास्तव्यास होता. पुढं गावात निवडणुकीचे वारे वाहत होते, अशातच आपणही गावच्या विकासात हातभार लावला पाहिजे, गावातील शिक्षण-रस्ते-वीज आणि पाणी या मूलभुत प्रश्नांना मार्गी लावलं पाहिजे अशा आशावादासह तो निवडणुकीत उतरला. पण, फक्त आशावाद असून काही होत नाही त्यासाठी योग्य राजकीय कसबही लागतं याची जाणीव निकाल नंतर त्याला झाली.


निकालाच्या दिवशी विकास शिंदेची घोर निराशा झाली. कारण अवघी बारा मतंच त्याला मिळाली होती. ज्या बारा मतदारांनी त्याच्यावर विश्वास दाखवला होता, त्यांच जाहीर आभार तर मानले पाहिजेत, ते कोण आहेत हे माहीत नसल्यामुळे त्यानं थेट गावात बॅनर लावले. बारा मतदारांनी आपल्याला संघर्ष करण्याची ताकद दिली आहे, याच बारा मतदारांच्या मतांवर देश आपल्याला स्वीकारेल हा आशावाद नजरेसमोर ठेवत त्यानं अनोखा निर्णय घेतला.
हे बॅनर गावात झळकले आणि त्याचीच चर्चा सुरू झाली. ज्यावेळी हे बॅनर सोशल मीडियात व्हायरल झाले आणि त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. विजयी उमेदवाराचे बॅनर आणि पेपर मधील जाहिरातीत निवडणुकीत पराभूत होऊनही अनेकांचीच मनं जिंकणाऱं हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

‘गावाच्या विकासाची स्वप्नं बघून मी निवडणुकीत उतरलो होतो. मतदारांना माझे विचार पटले नाहीत, मात्र मी निराश नाही. मी तरुण आहे, अजूनही अनेक निवडणुका आहेत. एकदा जनसेवा करायची हे ठरवलंच आहे. त्यामुळ भविष्यात यश मिळेल’. अशी आशा विकास व्यक्त करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...