Wednesday, June 9, 2021

थोरात सहकारी साखर कारखाना करणार ऑक्‍सिजन निर्मिती ; पंधरा दिवसात ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार

oxygen plant

संगमनेर ( प्रतिनिधी ) राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर सुरू केले असून या कोविड सेंटर करिता व इतर रुग्णालयांत करिता लागणा-या ऑक्सिजनसाठी कारखान्याच्या वतीने तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात हा ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटात जनसामान्यांना सातत्याने मोठी मदत केली आहे. त्यांच्यावर राज्यात प्रशासनाची मोठी जबाबदारी असतानाही अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेताना कोरोना रुग्णांना औषधे, ऑक्सीजन याचबरोबर चांगल्या सुविधा देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. ही कोरोणा वाढ कमी करण्यासाठी तालुक्यात घरोघर तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील व जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी राज्य पातळीवरील वरिष्ठ स्तरावरून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऑक्सिजन मिळवला आहे.

नगर रोडवरील विघ्नहर्ता लॉन्स येथे थोरात कारखान्याने ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर  सुरू केले असून या केअर सेंटर करिता व इतर रुग्णालयांकरीता लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणेसाठी कारखान्याच्या व्यवस्थापनाने तैवान येथून स्किड माऊंटेड ऑक्सीजन प्लांट खरेदी करण्याचा दूरदृष्टीने निर्णय घेतला आहे. या ऑक्‍सिजनच्या प्लांट वर 7 घनमीटर क्षमतेची दैनंदिन 85 ऑक्सिजन सिलिंडर भरले जाऊ शकणार आहे. यातून दररोज १ टन १९० किलो ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे कोवीड केअर सेंटर तसेच इतर रुग्णालयांकरता होणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार आहे. हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.

नामदार बाळासाहेब थोरात यांनी या कोरोना संकटात कृतिशीलतेतून अनेक धोरणात्मक निर्णय घेताना नागरिकांना दिलासा दिला आहे. याचबरोबर स्वतःचे एक वर्षाचे मानधन सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. तसेच अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमधील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार आहे. तालुक्‍यातील ऑक्सिजनची गरज भागवण्याकरीता विविध ऑक्सिजन रिफिलिंगच्या समस्या सोडवत मोठी मदत करून ऑक्सिजन मिळवला आहे.

कोरोना संकटात कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीसाठी अत्यंत तातडीने तैवान येथून या प्लंटची खरेदी केली असून येत्या पंधरा दिवसात हा प्लंट उभा करून यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरणार असून कारखान्याच्या या निर्णयाबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक नामदार बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे,सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे तालुक्यातील नागरिकांमधून अभिनंदन होत आहे.

दैनिक युवावार्ताने बुधवारी (दि. २८) संगमनेरला गरज ऑक्सिजन प्लांट व मोठ्या हॉस्पिटलची ; संगमनेरकरांनो आपणच होऊ आपले रक्षक अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यास संगमनेरमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता थोरात कारखाना ऑक्सिजन प्लांट उभारणार असल्याने संगमनेकरांना दिलासा मिळाला आहे. आणि आनंदही व्यक्त केला जात आहे.

संगमनेरला गरज ऑक्सिजन प्लांट व मोठ्या हॉस्पिटलची ; संगमनेरकरांनो आपणच होऊ आपले रक्षक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,993चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

मुख्‍यमंत्री महाआरोग्‍य योजनेअंतर्गत मोफत कौशल्‍य प्रशिक्षणाची संधी ; युवक-युवतींसाठी 11 जून रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन

अहमदनगर - अहमदनगर जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक / युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय...

५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा शिथील करावी; मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी; उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी दिल्लीत घेतली मोदींची भेट

मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत...

संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुकच्या सरपंचांनी उलगडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गावाच्या कोरोनामुक्तीचा पट

अहमदनगर: 'साहेब, कोरोनाचं संकट वाढत होत आणि गावात निवडणूक लागली. पण हे संकट ओळखून गावकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध...

गोरगरिबांवर लादलेली भाववाढ तातडीने कमी करावी – आ.डॉ.सुधीर तांबे ; संगमनेर काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात तालुकाभर आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी)मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले...

आजपासून लालपरी पुन्हा धावतेय रस्त्यावर ; दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर एस.टी. पुन्हा सुसाट

संगमनेर (प्रतिनिधी)मागील 64 दिवसांपासून कोरोना निर्बंधाच्या ब्रेकमुळे थांबलेली एसटी ‘प्रवाशांच्या सेवेसाठी जिल्हयांतर्गत व अंतर जिल्हयासाठी आजपासून धावू...