Sunday, April 11, 2021

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले नाही. शहर व तालूक्यात नियमाप्रमाणे रात्रीची संचारबंदी व दिवसाच्या जमावबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच शासनाने निर्बंध घातलेली आस्थापने बंद ठेवावे. तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. बेजबाबदार नागरिकांवर नियमांप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी सर्व कोव्हीड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे तहसिलदार अमोल निकम यांनी केले.

संगमनेर (प्रतिनिधी)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यात कडक निर्बंध लागू केले. राज्य पुर्ण लॉकडाऊन न करता अत्यावश्यक सेवा वगळता मनोरंजन, सेवा, वाहतूक यासह अनेक गोष्टींवर कडक निर्बंध लावले आहेत. राज्यात शनिवार व रविवार पुर्णतः लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदीचा आदेश लागून करण्यात आला आहे. हा आदेश संगमनेरसाठीही लागू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात आल्याचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगीतले.


कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ठाकरे सरकारने सोमवार दि. 5 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. इतर निर्बंधाबरोबरच प्रत्येक शनिवारी व रविवारी 100% लॉकडाऊन राज्यात होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा, सलून, ब्युटीपार्लर, हॉटेल, परमीट बार, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, जीम, उद्यान बंद राहणार आहे. तर भाजीबाजार, किराणा माल, दुध, मेडीकल आदी ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन ते सुरु ठेवण्यात येणार आहे.
शेती व शेती विषयक कामे, अन्नधान्य ने आण करणे, कृषि सेवा केंद्र हे नेहमीप्रमाणे सुरु राहतील. शाळा कॉलेज मात्र बंद ठेवण्यात येणार आहे.
राज्यात सोमवारपासून सर्व मॉल, रेस्टॉरंट, बार बंद ठेऊन होम डिलीव्हरी सुरु करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालये 50% क्षमतेनेे सुरु ठेवण्यात येणार आहे. तर खाजगी उद्योगांना वर्क फॉर्म होमचे आदेश देण्यात आले आहे.


बांधकाम व्यवसाय सुरु ठेवण्यात येणार असून ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे व त्याच ठिकाणी मजूर वास्तव्यास आहे त्यांना परवानगी राहील मात्र इतर बांधकाम मजूरांना इतर ठिकाणी ने-आण करण्यास किंवा नवीन बांधकामास परवानगी नसणार आहे. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र मंदिरातील पुजा-अर्चा नियमीत सुरु राहील. उपहारगृहे बंद ठेवण्यात येणार असली तरी पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु असणार आहे. रस्त्याच्याकडेला खाद्यविक्री करणार्‍यांना केवळ पार्सल सुविधा ठेवण्यास परवानगी आहे. कटींग, सलून ब्यूटी पार्लर, स्पा बंद ठेवण्यात येणार आहे. वृत्तपत्रे छपाई व वितरण सुरु राहील मात्र लसीकरण आवश्यक असणार आहे. उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरु राहील मात्र नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...