Thursday, March 4, 2021

संगमनेरमध्ये चोरीचे सत्र सुरूच ; ह्युंदाई कंपनीचे दालन फोडले

शहरापासून काही अंतरावर असणार्‍या कोल्हार-घोटी मार्गावरील ह्युंदाई कंपनीचे चारचाकी वाहनाचे दालन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत चोरट्यांनी मोठा ऐवज चोरुन पोबारा केला आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी याच परिसरात एका वाहनाच्या शो रूम मध्ये धाडसी चोरी करत सव्वा लाखाची रोकड चोरून नेली होती. या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसतानाच चोरटयांनी या हुंदाई शो रूम मध्ये चोरी केल्याने नागरिकांसमोर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरापासून काही अंतरावरच कोल्हार-घोटी मार्गावर ह्युंदाई कंपनीचे दालन आहे. नेहमीप्रमाणे हे दालन सोमवारी (ता.15) बंद करुन अधिकारी व कर्मचारी घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दालनाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाच्या सहाय्याने संरक्षक भिंतीच्या आतमध्ये प्रवेश केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानंतर शटरचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. रोखपाल कक्षाची व कोठारामधील सामानाची उचकापाचक करत ऐवज चोरल्याची शक्यता आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यामध्ये दोन चोरटे प्रथमदर्शनी दिसत असून अजूनही चोरटे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, सकाळी नेहमीप्रमाणे दालन खुले करण्यासाठी सुरक्षा रक्षक, अधिकारी व कर्मचारी आले असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तत्काळ याची माहिती दालनाचे संचालक संदीप शिरोडे यांना दिली. तसेच पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दालनाची संपूर्ण तपासणी करुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा ठरविली आहे. यानंतरच किती ऐवज चोरीला गेला आहे हे निष्पन्न होणार आहे. याबाबत सायंकाळपर्यंत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.


यापूर्वी वेल्हाळे शिवारातील चारचाकी वाहनाचे दालन फोडून सव्वा लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. अद्यापही या घटनेचा तपास लागला नाही. त्यातच पुन्हा चारचाकीचे दालन चोरट्यांनी लक्ष्य करुन ऐवज चोरल्याची शक्यता आहे. एकामागून एक होणार्‍या चोर्‍यांसह पठारभागात वन्यजीवांची तस्करी करणारी टोळी व दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली असून सोळा दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे बाळेश्वर मंदिराजवळ असलेली पोलिसांची बिनतारी संदेश यंत्रणा देखील चोरट्यांनी लुटून नेला. यामुळे शहर, तालुका व घारगाव पोलिसांपुढे चोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...