Wednesday, March 3, 2021

घुसखोर चीनला भारतीय सैनिकांनी शिकवला धडा ; चीनचे २० सैनिक जखमी

पूर्व लडाख सीमेजवळ चीनच्या सैनिकांनी अतिक्रमण केलेले असतानाच आता सिक्कीमध्ये सुद्धा चीनच्या सैनिकांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे. इंडियाने टुडेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये २० चिनी सैनिक जखमी झाले आहेत.

भारताच्या बाजूला चार जवान जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असतानाही, भारतीय जवानांनी चीनचा घुसखोरीचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. पीएलएच्या सैनिकांना मागे ढकलले. चकमक झालेल्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. सिक्कीकमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असले, तरी भारतीय सैन्याचे चीनच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काही महिन्यापूर्वी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात पॉईंट १४ जवळ दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. पूर्व लडाख सीमेवरील वाद अद्यापी मिटलेला नाहीय. नऊ फेऱ्यांच्या चर्चेनंतरही काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. सिक्कीममधील या घटनेमुळे आता पूर्व लडाखमध्येही तणाव वाढू शकतो


पूर्व लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी मध्यंतरी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने काही उपाय सुचवले होते. पण आता स्वत: चीननेच त्याचे उल्लंघन केले आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनने आपली स्थिती भक्कम केली आहे. नियंत्रण रेषेजवळ संघर्ष असलेल्या भागात शांतपणे आणि टप्याटप्याने सैनिकांची संख्या सुद्धा वाढवली आहे. चार महिन्यापूर्वी चीननेच स्वत: संघर्ष असलेल्या भागांमध्ये दोन्ही बाजूंनी सैनिक संख्या वाढवणं टाळलं पाहिजे, असं म्हटलं होतं. त्यामुळे चीनने पुन्हा विश्वास घात केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...