– ललित ओझा

नाशिककर आणि मिसळ हे अनेक दशकांपासूनचे अतुट नाते आहे. असे म्हंटले तरी वावगं ठरणार नाही. अवघ्या 15 ते 20 दिवसाच्या कालावधीत मुळ नाशिकर असलेले किरण मामा पिंगळे यांच्या संकल्पनेतून व प्रतिक संधान यांच्या जिद्दीने व मेहनतीने Grape Embasy झटका मिसळ जिंकत आहे नाशिककरांनी व खवय्येगिरी शौकिनाची मने…. किरण पिंगळे मामा यांच्या संकल्पनेतून गेल्या 2 वर्षांपासून द्राक्षाच्या बागेसाठी मेहनत, काबाडकष्ट करत बाग तयार केली व आपणही ग्राहकांना काही तरी नविन द्यावे ही संकल्पना मनात ठेवून युवक, युवती बालगोपालसह आबालवृद्ध व्यक्ती यांना ही आवडेल व मित्र परिवार व विशेष परिवारासह आपण मिसळचा आनंद ग्राहकांना देऊ शकतो. यांचा विचार करून नाविन्यपूर्ण संकल्पनेतून द्राक्षाच्या बागेत, अतिशय निसर्गाच्या सानिध्यात, सोबत समधुर संगीत, बालगोपासाठी फिरण्याची जागा, जिप, ट्रॅक्टरसह घसरगुंडी व कॉलेज युवक, युवतीसाठी स्पेशल सेल्फी पॉईंट करण्यात आले आहे हे विशेष.


अवघ्या 15 ते 20 दिवसाच्या कमी कालावधीत ग्राहकांची मने जिंकण्यात पिंगळे मामा व प्रतिक संधानसह मामाचे चिरंजीव शुभांकर पिंगळे व संपूर्ण परिवार सरस ठरला आहे. प्रतिक संधान यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माहिती देतांना सांगितले की, पिंगळे मामा यांची व आमची 2 वर्षापासन संकल्पना होती. आम्ही मुळ नाशिकर आहे आणि मिसळ आणि नाशिकर हे एक अतूट नातं आहे. ग्राहकांची आवड निवड लक्ष्यात घेऊन आम्ही ही मिसळ सुरू केली आहे. आपण सातारा सांगली येथे मिसळ खातो मात्र काही तरी नाविन्यपूर्ण देण्याचे आम्ही ठरवले व अतिशय अल्पदरात म्हणजे आगदी सर्वसामान्य ग्राहकांना ही परवडेल अशी 100 रुपयात 1 पाणी बॉटल,1 पापड, मटकी, शेंगदाणे, बटाटा मिक्स, पाव, दही वाटी द्राक्षे, मनुका चॉकलेट अशी नाविन्यपूर्ण डिश देऊन ग्राहकांची मने ही जिंकत आहे. आजचे मराठी युवक उद्याचे भविष्य आहे. आजच्या युवकांनी उद्योगात पडावे असे ही त्यांनी आवर्जून सांगितले.

स्वछता राखून मास्क, सॅनिटायजरचा वापर करून कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून हा व्यवसाय केला जात आहे. मी व शुभाकर हे उच्चशिक्षत आहे. काही वर्षे मी जॉब केला. अनेक संकटे आली मात्र कधी डगमगलो नाही. हार मानली नाही. व्यवसाय करण्याची आवड व ईच्छा होती. ती आज पुर्ण होतांना दिसत आहे. आई वडिलांची, मामाची ईच्छा आज तुमच्या सारख्या प्रेमळ ग्राहकांमुळे व पाठिंब्यांमुळे पूर्ण होत आहे यांचा आनंद खरच माझ्यासाठी व परिवारासाठी खूप मोठा आहे. ग्राहकांची आवड हीच आमची ओळख आहे व संपूर्ण परिवार मामा, मामाचे चिरंजीव आई वडिल सर्वांचे योगदान आहे. सर्व मित्र परिवारांनी आवर्जून भेट द्यावी व द्राक्षाच्या बागेमध्ये बसुन मित्र परिवार व परिवारासह मिसळ पाव खाण्याचा आनंद लुटावा. त्यांना त्यांच्या परिवाराला पुढील वाटचालीसाठी दैनिक युवावार्ता परिवाकडून खुप खुप शुभेच्छा…

