Thursday, March 4, 2021

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी – नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट नंबर 111,112 तील 6 हेक्टर फॉरेस्टला गुरुवार दि.28.1.2021 रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान भीषण आग लागली. सदर आगीत जंगलातील झाडे – झुडपे जाळून खाक झाली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

याबाबत आग ही शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वनधिकारी यांनी वर्तवला आहे. या फॉरेस्ट शेजारीच लोक वस्ती, डाळिंब बाग व पेट्रोल पंप आहे. आग लवकर आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना व संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या.. यावेळी सामाजिक वनीकरण अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होते.

यावेळीमाजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर , सीताराम दिड्डी, अमोल दिघे, निलेश दिघे, अनिल दिघे , सतीश मुळे ,सुनील दिघे, मातीन शेख ,आदींसह तळेगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात अखेर यश मिळाले. या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही मात्र जंगलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...