Thursday, January 28, 2021

सिडनी कसोटी ; मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी

ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी

सिडनी – तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. सिडनीच्या मैदानावर मद्याच्या अमलाखाली असलेल्या काही समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यांची वक्तव्ये खूपच अपमानास्पद होती. हा प्रकार कर्णधार अजिंक्य रहाणेच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने या बाबत मैदानावरील पंचांकडे धाव घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात हा प्रकार घडला. जेव्हा सिराज सीमा रेषेवर फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत होता. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

बरोबर १३ वर्षांपूर्वी याच सिडनीमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत वर्णद्वेषी शेरेबाजीवरुन एक मोठा वाद झाला होता. अँड्रयू सायमंडसने हरभजन सिंगवर वर्णद्वेषी शेरेबाजीचा आरोप केला होता. हरभजनने वर्णद्वेषी शेरेबाजी करताना मला माकड म्हटले असा आरोप सायमंडसने केला होता. या आरोपाचे मैदानावर आणि मैदानाबाहेरही पडसाद उमटले. दोन्ही संघांमधील मैत्रीपूर्ण वातावरण बिघडले होते. दोन्ही देशाची क्रिकेट मंडळ, खेळाडू, माजी खेळाडू, मीडिया आणि दोन्ही देशाची सरकारं या वादामध्ये सहभागी झाली होती.

तिसऱ्या दिवशी सिडनी कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियानं आपलं निर्वादित वर्चस्व राखलं आहे. दुसऱ्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या कांगारुंनी तिसऱ्या दिवशी जोरदार प्रतिहल्ला करत सामन्यावर वर्चस्व राखलं आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३८ धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसऱ्या दिवशी २४४ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. त्यानंतर सयंमी पण आक्रमकपणे फलकावर १०३ धावा उभा केल्या. वॉर्नर आणि फुकोव्हकी यांच्या रुपानं ऑस्ट्रलियाला दोन झटके बसले. मात्र, तिसऱ्या दिवसाखेर लाबुशेन आणि स्मिथ यांनी भारताला आणखी विकेट दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन ४७ तर स्मिथ २९ धावांवर नाबाद होते. भारताकडून सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...

भांडणाला वैतागून मुलाने केला बापाचा खून ; आरोपीस अटक

घारगाव (प्रतिनिधी)घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही...