Sunday, April 11, 2021

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर पोलिसांनी सापळा रचून या चोर लुटारुंची टोळी जेरबंद केली. सहा पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून तीन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही कारवाई समनापूर बायपास पुणे रोडवर शनिवारी रात्री एक च्या सुमारास करण्यात आली. यावेळी या दरोडेखोरांकडुन कोयता, गिलोर व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. या सर्व दरोडेखोरांवर यापुर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.


कोविड संकटामुळे अर्थव्यवस्था बिघडल्याने अनेक जणांवर आर्थिक संकटे ओढावली आहे. अनेक जणांचे रोजगार हिरावला आहे. मात्र सर्वसामान्य माणूस संघर्ष करीत आहेत. तर दुसरीकडे काही तरुण झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर, घाटात तसेच आडमार्गावर प्रवाशांना, वाहनचालकांना लुटण्याच्या घटना घडत आहे. नाशिक पुणे महामार्गावरील अनेक पुलाखाली व इतर सुनसान रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत हे चोरटे दबा धरून बसतात. येणार्‍या दुचाकीस्वार किंवा प्रवासी वाहन अडवून त्यांना घातक शस्राचा धाक दाखवून भीती दाखवली जाते. त्यानंतर त्यांच्याकडून किमती सामान, मोबाईल, रोख रक्कम जबरदस्तीने घेतली जाते. न दिल्यास प्रसंगी मारहाण केली जाते. आतापर्यंत अनेक लोकांना या चोरट्यांनी मारहाण करून लुटले आहे. काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकालाही चोरट्यांनी लुटले होते. भीती पोटी व कमी रकमेची लुट म्हणून कोणी फारशी पोलीसांत तक्रार करत नाही. म्हणून या चोरट्यांचे फावत होते.


दरम्यान समनापूर शिवारात पुणे बायपास रस्त्यावर अज्ञात चोरटे प्रवाशांना लुटत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. देशमुख यांनी पोलीस पथकासह या ठिकाणी धाव घेतली. यावेळी पोलिसांना काही चोरटे आढळून आले. पोलिसांना पाहून चोरट्यांनी पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी विक्रम रामनाथ घोडेकर (वय 20, पंपींग स्टेशन, कासारवाडी रोड) अजित अरूण ठोसर (वय 20, पंपींग स्टेशन, कासारवाडी रोड) सर्फराज राजू शेख (वय 19, रा. लालतारा कॉलनी, अकोले नाका) या तीघांना अटक केली असून त्यांचे साथीदार कलिम अकबर पठाण, हलिम अकबर पठाण, असिफ शेख (सर्व रा. जमजम कॉलनी) हे फरार झाले आहेत. त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चोरट्यांचा तपास महिला पोलिस उपनिरिक्षक निकीता महाले करत आहेत.
दरम्यान या चोरटयांपैकी विक्रम घोडेकर याच्यावर विविध कलमाखाली 2, अजित ठोसर याच्यावर 1, कलिम पठाण याच्यावर 6, हलिम पठाण याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...