Thursday, March 4, 2021

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांच्या उपस्थितीत अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, व प्रत्येक प्रवर्गातील स्त्री प्रवर्गासाठी सरपंच पदे तसेच सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्रियांसाठी सरपंच पदे आरक्षीत करण्यात आली. अनुसूचित जाती एकूण 13 पैकी खुला 7, स्त्री 6, अनुसूचित जमाती एकूण 17 पैकी खुला 8, स्त्री 9, नागरीकांचा मागास प्रवर्ग एकूण 39 पैकी खुला 19, स्त्री 20, सर्वसाधारण एकूण 74 पैकी खुला 37, स्त्री 37 असे आरक्षण जाहीर झालेले आहे.

ओवी भारत शिंदे (रा. मानेवाडी) व श्रद्धा आप्पासाहेब दरेकर (रा. पिंपळगाव देपा) या मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

अनुसूचित जाती-
स्त्री राखीव- खळी, शिंदोडी, सारोळेपठार, वेल्हाळे, सावरगाव खुले, रायते,
खुले:– कसारे, मनोली, माळेगाव हवेली, कासारा दुमाला, देवकौठे, साकुर, हिवरगावपठार

अनुसूचित जमाती-
स्त्री राखीव- शेंडेवाडी, चिकणी, सोनेवाडी, पारेगाव खुर्द, निमज, समनापूर, जवळेकडलग, चिखली, सायखिंडी,
खुले:– शेडगाव, आश्‍वी बुद्रक, कौठे खुर्द, कनोली, पिंपरणे, मिझापूर, वडगावलांडगा, पोखरी हवेली,

नागरिकांचा मागास प्रवर्ग
स्त्री राखीव-औरंगपूर, वरवंडी, देवगाव, म्हसवंडी, डोळासणे, रहिमपूर, कौठेकमळेश्‍वर, पिंपळे, कोकणगाव, निमगावजाळी, सुकेवाडी, तळेगाव दिघे, राजापूर, कोळवाडे, बोटा, धांदरफळ बुद्रूक, पारेगाव बुद्रूक, झोळे, कोंचीमांची, मंगळापूर,
खुले:- जवळेबाळेश्‍वर, अकलापूर, डिग्रस, पानोडी, पळसखेडे, चिंचोलीगुरव, चिंचपूर बुद्रक, लोहारे, शिबलापूर, करुले, खांबे, कुरण, वनकुटे, मेंढवण, कौठेमलकापूर, घारगाव, चंदनापुरी, चणेगाव, माळेगावपठार

सर्वसाधारण
स्त्री राखीव- वाघापूर, काकडवाडी, धांदरफळ बुद्रक, निमगाव भोजापूर, निंबाळे, निळवंडे, जांभुळवाडी, पिंप्रीलौकी, कनकापूर, पिंपळगाव देपा, हंगेवाडी, पेमगिरी, अंभोरे, बोरबनवाडी, खराडी, कुरकुंडी, कुरकुटवाडी, भोजदरी, महालवाडी, ओझर बुद्रूक, वडझरी बुद्रूक, कर्जुलेपठार, जांबुत बुद्रूक, बिरेवाडी, आश्‍वी खुर्द, उंबरीबाळापूर, संगमनेर खुर्द, नान्नजदुमाला, कोल्हेवाडी, मालुंजे, पिंपळगाव कोझिंस, सावरचोळ, शिरापूर, घुलेवाडी, ओझर, जोर्वे, पिंपळमाव माथा,
खुले:- दरेवाडी, खरशिंदे, मिझापूर, सावरगाव तळ, सोनोशी, तिगाव, निमगाव बुद्रूक, गुंजाळवाडी, रायतेवाडी, निमगाव खुर्द, कौठे धांदरफळ, हिवरगाव पावसा, दाढ खुर्द, वरुडीपठार कर्‍हेे, मालदाड, खांडगाव, खांजापर, निमगावटेंभी, शिरसगाव धुपे, आंबीखालसा, मांडवे बुद्रूक, नांदुरी दुमाला, रणखांबवाडी, आंबीदुमाला, सादतपुर, खंदरमाळवाडी, पोखरी बाळेश्‍वर, नांदुरखंदरमाळ, सांगवी, कौठे बुद्रूक, वडगावपान, प्रतापपूर, वडझरी खुर्द, निमोण, जाखुरी, झरेकाठी आदि प्रमाणे हे आरक्षण काढण्यात आले.


निवडणूक निकालानंतर आरक्षण सोडत जाहीर झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनेक ठिकाणी काट्याची टक्कर होऊन एका जागेने बहुमत मिळाले. मात्र आत्ताच्या सरपंच सोडतमध्ये बहुमत असूनही सरपंचपद दुसर्‍या गटाला मिळाल्याने बहुमत असून सत्ता नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्याच बरोबर सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधणार्‍या अनेक उमेदवारांचा यामुळे मोठा भ्रमनिरास झाला आहे. काही ठिकाणी अल्पसंख्याक समाजाला लॉटरी लागली असून पहिल्याच वेळेस निवडून आल्यानंतर थेट सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...