Thursday, March 4, 2021

रेणू शर्माची बलात्काराची तक्रार मागे ; धनंजय मुंडेंना मोठा दिलासा

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. रेणू शर्माने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही याची गांभीर्याने दखल घेतली होती. परंतु पोलिसांच्या तपासात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही सिद्ध झालं तरच पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.
आता संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने गुन्हा दाखल करु नये अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या या महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. तर मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्याने देखील महिलेवर असाच आरोप केला आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत हनी ट्रॅप नाही : सुप्रिया सुळे
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाची सविस्तर चौकशी करावी अशी आमची आधीपासून मागणी होती. हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे अत्यंत वाईट आहे. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आपण बोलत नसतो. पण भाजपकडून यात राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

खोटे आरोप करणाऱ्या शर्मावर गुन्हा दाखल करण्याची चित्र वाघ यांची मागणी
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. परंतु आता संबंधित महिलेने त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने खोटे आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. सरकारी यंत्रणाचा बराच वेळ या प्रकरणात गेला. अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचं वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीनवही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...