Wednesday, March 3, 2021

शहर अस्वच्छ करणार्‍यांवर संगमनेर नगरपालिकेची दंडात्मक कारवाई

संगमनेर (प्रतिनिधी)
स्वच्छता अभियानात संगमनेर नगरपालिकेने सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त केला. नागरीकांच्या आरोग्यासाठी पालिकेकडून स्वच्छतेबाबत विविध उपक्रम, अभियान राबवून शहरात स्वच्छता ठेवली जाते. मात्र काही नागरीक या स्वच्छता अभियानाला गालबोट लावण्याचे काम करत आहे. रस्त्यावर पाणी मारणे, कचरा टाकणे, ओला व सुक्या कचर्‍यांचे विभाजन न करणे असे प्रकार वारंवार केले जात असल्याने आता पालिकेने अशा बेजाबदार नागरीकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतून गेल्या दोन दिवसांत शहरातील अनेक मान्यवरांकडून हजारो रूपयांचा दंड पालिकेने वसूल केला आहे. विशेष म्हणजे यात डॉक्टरांचाही समावेश आहे.


कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असतांना स्वच्छेतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारानेही स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी व गाव शहरे स्वच्छ राहण्यासाठी देशपातळीवर स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजीत केलेली आहे. या स्पर्धेत संगमनेर नगरपालीकेने सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त केला आहे. माजी वसुंधरा या अभियाना अंतर्गतही शहरात विविध उपक्रम राबविले जात आहे. रस्त्यांचे डांबरीकरण, सोलर सिस्टीम, हरीत पट्टे, उद्याने, कचर्‍याचे विलगीकरण आदि उपाय योजना करून हरित शहर, सुंदर शहर निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात येत आहे.

मात्र काही बेजाबदार नागरीक जाणीवपूर्वक अस्वच्छता निर्माण करीत आहे. रस्त्यावर पाणी मारणे, घरातील कचरा रस्त्यावर टाकणे, हॉस्पीटलचा धोकादायक कचरा असाच फेकून देणे. उष्टे अन्न रस्त्यावर फेकणे, रस्त्यात गाड्या धुणे, तसेच नळांना तोटी न लावणे हे प्रकार वारंवार नागरीकांकडून केले जात आहे. अशा बेजाबदार नागरीकांवर वचक ठेवण्यासाठी पालिकेने पथक तयार करून थेट दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत अनेक सुशिक्षीत लोकांनाही 100 रूपयापासून ते थेट 1 हजार रूपायापर्यंत दंड करून तो सक्तीने वसून करण्यात आला आहे. नागरीकांनी अशा प्रकारे अस्वच्छता पसरू नये व स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...