Thursday, January 28, 2021

प्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

संगमनेर ( प्रतिनिधी )
प्रत्येक कवीच्या कवितेतून त्या त्या काळातील वर्तमानाचे प्रतिबिंब उमटत असते, कवी जे बघतो अनुभवतो ते शब्दांच्या माध्यमातून कवितेत मांडतो त्यामुळे प्रभाकर खैरे यांची कविता पन्नास साठ वर्षांपूर्वीचे त्यांचे वर्तमान दाखवण्याचे काम करते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा. संतोष पद्माकर पवार यांनी केले.

शहरातील व्यापारी मंडळ सभागृहात आयोजित ज्येष्ठ कवी प्रभाकर खैरे यांच्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील व सौ. विमल प्रभाकर खैरे हे उपस्थित होते.


येथील व्यावसायिक राजेंद्र खैरे यांचे पिताश्री व प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांचे सासरे असलेल्या प्रभाकर खैरे यांनी चार पाच दशकांपूर्वी लिहून ठेवलेल्या कविता त्यांच्या नातीला एका वहीत सापडल्या. या कवितांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खैरे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. वयाच्या 85 व्या वर्षी माझा कवितासंग्रह प्रकाशित होईल असे कधीच वाटले नाही मात्र आजवर जे काही लिहिलं त्याचं चीज झाल्याची भावना प्रभाकर खैरे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी प्रभाकर पाटील, प्रा. लक्ष्मण घायवट, प्रा. राजश्री तांबे, विनायक खैरे, प्रा. काळे आदींची भाषणे झाली. कौटुंबिक स्नेहीजनांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी, ज्येष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे, बालकुमार साहित्य संस्थेचे संदीप वाकचौरे, मराठी अध्यापक संघाचे जिजाबा हासे, दत्ता शेणकर, अनिल ठाकरे, मारुती फापाळे, छाया ढगे, काशीनाथ काळे, मोहन नेहे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. डॉ. अनुश्री खैरे यांनी केले तर डॉ. संतोष खेडलेकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र खैरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...

भांडणाला वैतागून मुलाने केला बापाचा खून ; आरोपीस अटक

घारगाव (प्रतिनिधी)घरघुती किरकोळ वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाला ठार मारल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आंबीफाटा येथून काही...