Thursday, March 4, 2021

अहमदनगर जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदान

नगर (प्रतिनिधी)
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. तर उर्वरीत चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान ज्या चार जागांसाठी जिल्ह्यात 14 केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असणार्‍या जिल्हा बँकेच्या निवडणूकीत समझोता एक्सप्रेसमधून 17 जागा बिनविरोध झाल्या. मात्र शेवटपर्यंत एकमत न झाल्याने अखेर या चार जागांसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणूकीसाठी शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळेत मतदान होणार आहे.
दरम्यान जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, नगर तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन मतदान केंद्र आहेत. बिगर शेती पूरकसाठी जिल्ह्यातील 14 तालुक्यात प्रत्येकी एक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवर बिगर शेती मतदारसंघातील मतदारांना मतदान करता येणार आहे.

मतदान केंद्र :
राहाता– जिल्हा परिषद शाळा
राहुरी– लालाशेठ बिहाणी प्रशाला
संगमनेर– भिकाजी तुकाराम मेहर विद्यालय
शेवगाव-आदर्श विद्यामंदिर शाळा
अकोले– जिल्हा परिषद शाळा
जामखेड– जिल्हा परिषद शाळा
श्रीगोंदा– जिल्हा परिषद शाळा
श्रीरामपूर– दादा वामन जोशी नवीन मराठी शाळा
कर्जत– जिल्हा परिषद शाळा
कोपरगाव– नगरपालिका शाळा
नगर- राष्ट्रीय पाठशाळा
नेवासा– जिल्हा परिषद शाळा
नेवासा खुर्द पारनेर– न्यू इंग्लिश स्कूल
पाथर्डी– जिल्हा परिषद शाळा

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...