Thursday, March 4, 2021

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ घरगुती गॅसचाही झटका : गॅस पन्नास रुपयांनी महागला; सर्वसामान्य बेहाल

मुंबई : आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) मुंबईत गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये ५० रुपयांची वाढ होणार आहे. सध्या १४ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७१९ रुपये आहे. त्यात मध्यरात्रीपासून ५० रुपयांची वाढ होणार आहे. एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता. त्यावेळी सिलिंडर आठशे रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि चलन विनिमय यानुसार कंपन्या किरकोळ विक्रीसाठी इंधन दर निश्चित करतात. देशभरात २८ कोटी ७० लाख एलपीजी ग्राहक आहेत.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलमधील महागाईने वाहनधारकांच्या खर्चात प्रचंड वाढ केलेली असताना आता घरगुती वापराचा गॅस सिलिंडर सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून टाकणार आहे. आज मध्यरात्रीपासून (मंगळवार) घरगुती वापराचा गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे. मुंबईत गॅस सिलिंडरसाठी आता ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागतील. डिसेंबरनंतर गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. याआधी एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा भाव ७८९.५० रुपयांपर्यंत वाढला होता.

पेट्रोल, डिझेलचे दर वाढत असतानाच घरगुती गॅस सिलिंडरनेही जोराचा झटका दिलेला आहे. या दरवाढीचा फटका विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना बसत आहे. अनुदानित गॅस सिलिंडरधारकांना मिळणारी सबसिडीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

गॅस सिलिंडरच्या किमतीत डिसेंबरपासून वाढ होतआहे. १ डिसेंबर २०२० रोजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १६ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा सिलिंडर ५० रुपयांनी महागले. त्यानंतर ४ फेब्रुवारी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १६ फेब्रुवारीपासून सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

गर्दीचे दुष्परिणाम – कोरोनाचा वाढता आलेख कायम ; तीन दिवसात ९५ जणांना कोरोनाची बाधा

संगमनेर (प्रतिनिधी)जानेवारीत कोविड विषाणूने काहिसा आराम घेतला मात्र मानवीय चुकांमुळे हा विषाणू पुन्हा एकदा पहिल्या पेक्षा अधिक...

आता २४ तास मिळणार कोरोना लस ; लसीकरणाच्या वेगासाठी सरकारने वेळेचे बंधन काढले

नवी दिल्ली : 'करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याकरता सरकानं वेळेची मर्यादा समाप्त केली आहे. देशाचे नागरिक आता...

फ्लेक्स लावून व गुलाबाचे फुल देऊन युवक काँग्रेसकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध

संगमनेर शहर व तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आंदोलनात आज महसुल मंत्री नामदार बाळासाहेब...

आरोप खोटे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हा पब्लिक ट्रस्टच – आंबरे पाटील

वीरगाव(प्रतिनिधी)-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर केवळ बदनामी करण्याचे उद्देशाने हितचिंतकांनी केलेले आरोप धादांत खोटे असून ही संस्था पब्लिक...

नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता पालिकेबरोबर पोलिसांनाही

संगमनेर (प्रतिनिधी)कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन व प्रशासनाने कोव्हीड साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली...