Thursday, January 28, 2021

संगमनेर रोटरीतर्फे तपासले पत्रकारांचे सर्वंकष आरोग्य

संगमनेर (प्रतिनिधी) – समाजात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट घटनेचा सखोलतेने अभ्यास करुन त्या घटना आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम पत्रकार अव्याहतपणे करीत असतात. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना न घाबरता सर्व कामे ते करतात. समाजासाठी धावपळ करत असतांना त्यांचे आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होतांना दिसते. बऱ्याचश्या पत्रकारांना आपल्याला काही व्याधी आहेत याची कल्पनाही नसते. हे सर्व लक्षात घेऊन रोटरी क्लब, संगमनेरच्या माध्यमातून पत्रकारांसाठी व त्यांच्या कुटूंबियांसाठी सर्वंकष आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार दि. 10 रोजी करण्यात आले होते.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून रोटरी नेत्र रुग्णालय येथे हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यामध्ये मधुमेह, मुत्रपिंड, यकृत, डोळे अशा मिळून एकूण 65 प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी संगमनेरमधील ज्येष्ठ पत्रकार किसन भाऊ हासे, गौतम गायकवाड, विकास वाव्हळ, श्याम तिवारी, संजय आहिरे, भारत रेघाटे, आनंद गायकवाड, अमोल मतकर, सतिष आहेर, धिरज ठाकूर, सुयोग हांडे, दैनिक युवावार्ताच्या संपादिका सुशिला हासे, निलिमा घाडगे व इतर पत्रकार बांधव, रोटरी संगमनेरचे अध्यक्ष रो. पवनकुमार वर्मा, सेक्रेटरी रो. योगेश गाडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अतुल आरोटे, डॉ. सुजय कानवडे, डॉ. किशोर पोखरकर, डॉ. विकास करंजेकर, डॉ. जैनेंद्र राहुड, प्रकल्प समन्वयक रो. दिलीपजी मालपाणी, रो. आनंद हासे, रो. संजय कर्पे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकार गौतम गायकवाड यांनी रोटरी क्लबने पत्रकारांच्या आरोग्याचा विचार करुन तपासणी शिबीर आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

डॉ. अतुल आरोटे यांनी सर्व रिपोर्ट काळजीपूर्वक पाहून पत्रकारांना योग्य तो सल्ला दिला. यापुढे पत्रकारांसाठी रोटरी उत्तमोत्तम कार्य करीत राहील व त्यांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेईल अशी ग्वाही रोटरी क्लबचे अध्यक्ष पनकुमारजी वर्मा यांनी दिली. सर्व पत्रकारांना त्यांनी कोविड व लॉकडाऊन काळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. सागर गोपाळे, डॉ. दर्शन खालकर सर्व पत्रकारांचे आभार रो. नरेंद्र चांडक यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...