Thursday, January 28, 2021

भंडारा रूग्णालयात मृत्यूचे तांडव ; आगीत होरपळून 10 बालकांचा मृत्यू

घटनास्थळी आगीचे बम्ब दाखल झाले

भंडारा –
महाराष्ट्रासाठी शनिवारची पहाट दुर्दैवी ठरली असून काळाने सगळे मध्यरात्री निद्रिस्त असताना डाव साधत दहा नवजात चिमुकल्यांना हिरावून घेतले. मध्यरात्रीच्या सुमारास भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दहा नवजात बालकांचा या अग्नितांडवात मृत्यू झाला.

चिमुकल्यांच्या आयांनी एकच हंबरडा फोडला

ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्किटमुळे भंडार्‍यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली. ही घटना शनिवारी रात्री अचानक घडली. रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे निदर्शनात आले. दार उघडून नर्सने बघितले असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. तात्काळ ही माहिती नर्सने रुग्णालयातील अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली. अग्रिशामक दलाने माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 नवजात चिमुकल्यांचा यात दूर्दैवी मृत्यू झाला.

रुग्णालयाबाहेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

या दूर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेनंतर पंतप्रधनांसह मुखमंत्री, आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी माहिती घेत चौकशीचे आदेश दिले. जखमी बालकांना दुसर्‍या रूग्णालयात तात्काळ उपचार सुरू केले असून पिडीत कुटूंबीयांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार आहे.

हॉस्पिटल मध्ये तणावाचे वातावरण आहे

मृत बालकांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत

मृत बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे सायंकाळी पाच वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत. मृत बालकांपैकी सात जणांचा मृत्यू धुराने गुदमरून झाला असून तिघे आगीत होरपळून मरण पावले आहेत. बालकांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर निश्‍चितच कठोर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

महाराष्ट्राच्या भंडार्‍यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली जिथे आपण अनमोल निरागस बालकांना गमावले शोकाकूळ संतप्त कुटुंबासोबत माझी सहानुभूती आहे. जखमी लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.
समस्त देशाला सुन्न करणार्‍या भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात केअर युनिटला आग लागून 10 नवजात बाळांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेच्या तातडीने चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, भंडार्‍यातील घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच, स्थानिक अधिकारी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

20,826चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

तळेगाव जवळील जंगलाला भीषण आग !!!

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नजीक लोणी - नांदूर शिंगोटे जवळील चिंचोली गुरव रस्त्या लगत असलेल्या गट...

संगमनेर ग्रामपंचायत निवडणूक : १४३ सरपंचांचे आरक्षण जाहीर ; अनेकांना लॉटरी तर काहींचा मोठा भ्रमनिरास

संगमनेर (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील 143 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काल बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत...

स्व: दत्ता झोळेकर : एका योध्याची अखेरची लढाई

- राजेंद्र फरगडे अकोले तालुक्यातील धुमाळवाडी हे दत्तांचे मुळ गांव. मात्र त्यांचे शिक्षण...

आंबेडकरी चळवळीच्या वात्सल्यमूर्ती सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

- हरीश केंची डॉ. बाबासाहेबआंबेडकर या महामानवासोबत आयुष्यभर व त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही अखेरपर्यंत पददलितांसाठी...

शेतकरी आंदोलन विस्कटले ; राष्ट्रीय मजदूर संघ, भारतीय किसान युनियनची माघार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ५८ दिवसांपासून विविध शेतकरी संघटना एकत्र येऊन करत असलेल्या आंदोलनात आज फूट...