Sunday, April 11, 2021

शनिवारी व रविवारी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत कारखान्यासह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या ऑनलाईन वार्षिक सभा

संगमनेर( प्रतिनिधी)
राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य व महाराष्ट्राचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे शनिवार दिनांक २० मार्च व रविवार दिनांक २१ मार्च २०२१ रोजी संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ यांसह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते सहभागी होणार आहेत.
शनिवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. तर दुपारी १२.३० वा. हरिचंद्र सहकारी पाणीपुरवठा फेडरेशन व १. वा. गरुड कुक्कुटपालन सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण होणार आहे. तर दुपारी ३ वा. शेतकी संघ येथे शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.


रविवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या अभ्यागतांना समवेत भेटीगाठी आहेत. तर सकाळी ११ वा. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून या सभेचे लाईव्ह प्रसारण कारखान्याच्या smbtsskamrutnagar या युट्युब चॅनेलवर केले जाणार आहे. तर दुपारी ३ वा. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्तींच्या व शासकीय नियम पालन करून या सर्व सहकारी संस्थांच्या सभा ऑनलाइन होणार आहेत. या वेळी अमृत उद्योग समूहातील व विविध संस्थांचे पदाधिकारी ही ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहे.
तरी या सर्व ऑनलाईन सभांमध्ये सभासद व हितचिंतकांनी सहभागी व्हावे असे आवाहन साखर कारखाना, राजहंस दूध संघ, शेतकी संघ, हरिश्चंद्र फेडरेशन ,अमृतवाहिनी बँक, गरुड कुकूटपालन या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -
- Advertisement -

नवीनतम लेख

संगमनेरात पुर्ण लॉकडाऊन नाही ; परंतू कडक निर्बंध लागू ! शनिवार व रविवार पुर्ण लॉकडाऊन

राज्य शासनाने जाहीर केलेले निर्बंध संगमनेरसाठी लागू असून प्रशासनाने संगमनेरसाठी सध्यातरी कोणतेही वेगळे नियम लागू केलेले...

संगमनेरमधील भयानक घटना ! सरकारी जमीनीची बोगस विक्री…!!!

निर्ढावलेल्या लँड माफीया, सँड माफीयांना लगाम कोण लावणार.बेकायदेशीर व्यवहारांसाठी कुणाचा पाठींबा आहे. शासकीय अधिकारी मुद्दाम तर...

नगर जिल्ह्यातील दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर:  जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी...

रस्त्यावर लुटमार करणारी टोळी जेरबंद ; संगमनेर शहर पोलिसांची कामगिरी

संगमनेर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून नाशिक पुणे महामार्गावर व आडमार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढत असल्याने सतर्क झालेल्या शहर...

धक्कादायक : संगमनेरात एकाच दिवशी सापडले तब्बल १४८ कोरोना रुग्ण; चिंता वाढली: संगमनेरवर पुन्हा लॉकडाउनची टांगती तलवार

जिल्ह्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज वाढतच आहे. बुधवारी काहिसा दिलासा मिळाल्यानंतर आज गुरुवारी कोरोनाने...