
अकोले (प्रतिनिधी)
जिलेबिच्या माध्यमातून संगमनेरसह लाखो नागरीकांच्या जीभेचे लाड पुरविणार्या जोशी स्वीट होम या मिठाई दालनाची नविन शाखा अकोले येथील बस स्टॅण्डसमोर सुरू होत आहे. गुरूवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जोशी स्वीटचे सुरेशकाका जोशी आणि लिला जोशी यांच्या शुभहस्ते तसेच अकोलेचे आमदार किरण लहामटे, माजी आ. वैभव पिचड व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती जोशी स्वीट होमचे संचालक राजेश जोशी व अभिजीत जोशी यांनी दिली.

जोशी जिलेबीवाले म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोशी स्वीट होममध्ये अस्सल खव्याचे मिठाईचे सर्व पदार्थ उपलब्ध आहे. संगमनेरकरांचे मन जिंकलेले जोशी जिलेबी अकोलेकरांच्या निश्चितच पंसतीस उतरेल अशी अशा जोशी बंधूंनी व्यक्त केली.
